विरभद्र विरशैव गणेश मंडळाची तिस वर्षांची परंपरा कायम
खानापूर प्रतिनिधी: शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live
करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या असल्या तरी देगलूर तालुक्यातील, विरभद्र विरशैव गणेश सार्वजनिक मंडळांने भक्तीच्या वेगळ्या वाटा चोखाळत मागील तिस वर्षांची उत्सवाची परंपरा आणि मांगल्य कायम ठेवण्याच्या प्रयत्न केला आहे. सरकारी नियमांप्रमाणे लहान मूर्ती ठेवण्यात आली असून, देखावे, चलचित्र आदींना फाटा देण्यात आला आहे. मुखदर्शन तथा आरती प्रसाद साठी गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते आहे, येत्या सोमवारी गणेश मंडळातर्फे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन गावातील तथा खानापूर परिसरातील अधिकाधिक जनतेने या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे, अवांतर सजावट व इतर खर्च टाळून समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक व आयोजक निळकंठ पटणे, विनोद रायकोडे यांनी सांगितलं आहे यामुळे खानापुरात यंदा गणेशोत्सवातून आरोग्य आणि समाजसेवेच्या माध्यमातून गणरायाच्या भक्तीचे सूर आळवले जाणार आहेत. या मंडळाची स्थापना ई.स १९९१ साली येथील मठाचे मठपती कै.बाबुअप्पा स्वामी व मंडळाचे प्रथम अध्यक्ष उमाकांत अटकळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली होती व आज तिस वर्षापासुन ते अखंडित आहे,व सामाजिक बांधिलकी जपत असल्याचं दिसतं आहे.व या करिता मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, संघटक, मार्गदर्शक मेहनत घेत आहेत..
No comments:
Post a Comment