* महाराष्ट्र सहकार महर्षी..आणि लिंगायत समाजाचे लोकनेते मा.काकासाहेब कोयटे *
वडूज.दि लिंगायत TV live विशेष प्रतिनिधी प्रा.अजय शेटे..
.वीरशैव लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक मा. ओमप्रका या श उर्फ काकासाहेब कोयटे यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे..
..अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील व्यापारी वर्गांने मिळून 1986 साली समता को. ऑप.क्रेडिट सोसाय टीची स्थापना केली..त्यामध्ये सिंहाचा वाटा हा मा.काकासाहेब कोयटे यांनी उचलून चे अरमन होण्याचा मान पटकावला..
..सन 2020..21 या आर्थिक वर्षात या सोसायटीने 1000 कोटींचा व्यावसायिक उद्दिष्ट टप्पा पार केला.यावरून या संस्थेची प्रगती आपल्या लक्षात येते..याचे सर्व श्रेय मा. ओमप्रकाश कोयटे याना जाते..त्यांच्या या कार्याची दखल घेवून च त्यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्ष पदी त्यांची प्रथम त्यांची निवड झाली..
..समता को. ऑप. सोसायटी च्या एकूण 13 व्यावसायिक शाखा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत व अजून 10 शाखांचा विस्तार लवकरच होणार आहे..
..या सोसायटीने ग्रामीण भागात कार्यक्षेत्र असूनही जवळजवळ 600 कोटींचे डि पाँ झि ट मिळवले असून इतर व्यवसायात 1000 कोटींचे रेकॉर्ड ब्रेक उद्दिष्ट पार केले आहे..
..प्रगत बँकिंग प्रणालीचा वापर करत या संस्थेने अल्पावधीतच हे यश मिळवले आहे.
RTGS..NEFT..IMPS यासारख्या वेगवान व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..मोबाईल बँकिंग..QR कोड.. चॅनेल फायनांसशियल सिस्टीम..याद्वारे ऑनलाईन मेसेज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. व सर्व व्यवहार विंना पावती व विना कागद करण्यात आला आहे.शिवाय ही सुविधा फक्त इतर सोसायटी क्षेत्रापुरती मर्यादित नसून सर्व मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांशी जोडली गेली आहे.
..सन 2020..21 या आर्थिक वर्षात सोने तारण व्यवहार हा एक 100 कोटीच्या घरात पोहचला आहे व येत्या पुढील वर्षात तो 200 कोटींच्या घरात पोहच विण्याचा मानस आहे..सोसायटीच्या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास www.samatapat.com या वेबसाईटवर संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे..
..समता संस्थेच्या या सर्व प्रगतीत मा.लोकनेते काकासाहेब उर्फ ओमप्रकाश कोय टे यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांना तंत्र सल्लागार संचालक संदीप कोयटे यांचीही मोलाची साथ मिळाली आहे..
..त्यांच्या या बँकिंग प्रणालीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून
नव्यानेच स्थापन झालेल्या स्वतंत्र सहकार मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मा. अमितजी शहा.. मा.शरदराव जी पवार साहेब यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर सदस्य म्हणून नेमणूक करून त्यांच्या उचित कार्याचा गौरव करून अभिनंदन ही केले आहे.
..महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव लिंगायत समाज संघटना यांच्या वतीनेही त्याच्या कार्याच्या कौतुकाचा ठराव करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मा.काकासाहेब उर्फ ओमप्रकाश कोयटे यांची भावी आयुष्यात अशीच प्रगती होत राहो हिच समाज बांधवां तर्फे हार्दिक शुभेच्छा **


No comments:
Post a Comment