वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न
वडूज.दि.28. :- .प्रा.अजय शेटे. वडूज प्रतिनिधी
येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन सकाळी 8 ते 10 या वेळेत साजरा करण्यात आला.
..यावेळी श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन वरिष्ठ शिक्षिका प्रा. सौ.रोहिणी बडवे यांचे हस्ते करण्यात आले.
..या कार्यक्रमात प्रा.रोहिणी बडवे..प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी..प्रा.अजय शेटे..प्रा. सौ.राधिका डोंबे..प्रा. संदिप तिवाटणे..प्रा.प्रशांत कुलकर्णी..विद्यार्थी..विद्यार्थिनी यांची मराठी भाषा गुणगान करणारी भाषणे झाली..सर्वांनी मराठी भाषा गीते गायली..ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.शंकरराव जाधव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले व आपले मनोगत व्यक्त केले..
..या वेळी मराठी राजभाषा का ? तिच्या अभिजात दर्जाच्या मागणीचे विशेष..मराठी भाषा इतिहास..संत साहित्य..आधुनिक कविता लेखन..तिचे संरक्षण व संवर्धन या विषयी मनोगते व्यक्त करण्यात आली..
..उच्च न्यायालय नियुक्त सदस्य डॉ.हेमंत पेठे..सतीश शेटे..नितीन जाधव..गोविंद भंडारे यांनी कार्यक्रमास शुभ चिंतन व्यक्त केले ..
..कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.सौ.मंगल काळे यांनी केली. व सूत्रसंचालन प्रा. सौ.ज्योती पाटील यांनी केले.आभार प्रा.रवींद्र येलमर यांनी मानले.
..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सौ.वासंती शेळके..प्रा.निवास मगर..प्रा.शुभांगी पंडीत..विद्यार्थी..विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment