जुनी सायकल करा दान..शिक्षण घेवूद्यात , प्रभूराज प्रतिष्ठान,लातूर
यांचा उपक्रम
सातारा, दि.26 - प्रा . अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
प्रभूराज प्रतिष्ठान,लातूर च्या वतीने मौजे
हरंगुळ येथे मोलमजुरी करून उपजिविका करणाऱ्या काही कुटुंबातील मुलींना जिल्हा प्रशाला शाळेत शिकण्यासाठी काही किलोमीटर वरून चालत येजा करावे लागते.त्यांना शिक्षण घेण्यासाठी येणारी अडचण व संभाव्य समस्या लक्षात घेवून काही मित्रांनी एकत्र येवून ' जुनी सायकल दान करा ' हा उपक्रम राबव ला .यात सामाजिक कार्यकर्ते उमाकांत क्षीरसागर यांनी सुरुवातीला दोन सायकली जमा केल्या व त्यांची दुरुस्ती करून त्याला संपूर्ण नवीन स्वरूप देवून चालविण्यास योग्य बनवल्या व या गरजू कुटुंबातील मुलींना वाटप करण्यात आल्या.
अशा प्रकारचे उपक्रम व सामाजिक कार्य करण्यासाठी समाजातील व्यक्तींनी नवनवीन कल्पना राबवाव्यात आणि समाजातील गरजू व्यक्तींना त्याचा लाभ करून द्यावा.त्यामुळे समाजा पुढील अनेक अडचणी कमी होतील.असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रभूराज प्रतिष्ठान चे अँड.अजय कलशेट्टी , समाजसेवक उमाकांत क्षीरसागर ,उपसरपंच धनराज पाटील,माऊली दहिफळे ,विशाल झुंजे पाटील,वैभव जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थ हजर होते .
No comments:
Post a Comment