Friday, March 25, 2022

कै.नारायणराव ताडकोले यांचे उद्या प्रथम पुण्यस्मरण.



कै.नारायणराव ताडकोले यांचे उद्या प्रथम पुण्यस्मरण..
 खानापूर: दि 27  शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live
 कै.नारायण रामजी ताडकोले यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन  दिनांक २९ मार्च मंगळवार रोजी खानापूर  येथे त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ताडकोले कुटुंबियांनी केले आहे.
देगलूर तालुक्यातील  खानापूर येथे नारायणराव ताडकोले यांचा जन्म तसा एक सधन शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे आईवडील
 कै.रामजी व गंगाबाई यांना दोन मुली व नारायणराव हे एकुलते पुत्र होते, अर्थातच एकुलता एक मुलगा असल्याने  ते आईवडीलांचे लाडके होते,कै ताडकोले यांनी त्याकाळातील माध्यमीक शिक्षण घेतलं होतं,समाजकार्याच्या आवडीने कुठलाही राजकीय वारसा नसतानाही त्यांनी गावातील राजकारणात सहभाग घेतला , त्यांना त्यावेळी ईरवंतरावजी अटकळे यांचे मार्गदर्शन लाभले व ते त्यांचे राजकीय गुरू होते असे काही जुने लोक आजही सांगतात, त्याबरोबरच गावातील अनेक दिग्गजांची साथ त्यांना मिळाली त्यामध्ये प्रामुख्याने नरसिंगराव राजप्पा पाटील, रेवणनाथराव पाटील (गुरुजी) हणमंतराव बाबाराव पाटील,व हणमंतराव पा.घरडे या व्यक्तींचा उल्लेख करावाच लागेल,कै.ताडकोले यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्ता व मृदुभाषा व सुसंस्कृतस्वभाव,व गावातील सर्व स्तरातील जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची ,व भेदभाव न करता सर्वसमावेशक अशा विचार सारणीच्या जोरावर नारायणराव ताडकोले हे सन १९८५ साली गावचे प्रथम नागरिक (सरपंच) झाले आणि त्यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सक्रिय राजकीय वाटचाल  सुरू केली.अनेक वर्षे त्यांनी गावचे सरपंच म्हणून ग्रामवासयांची सेवा करुन अनेक योजना औद्योगिक विकास महामंडळ, नृसिंह सहकारी सुत गिरणी, ग्रामपंचायत अंतर्गत किमान भाडेतत्त्वावर गाळ्यांचीनिर्मिती, आरोग्य उपकेंद्र,गाव ते फाटा पथदिवे, गावातील हेमाडपंथी महादेव मंदिर जिर्णोद्धार,या सारख्या महत्वकांक्षी व दुरोगामी योजना गावात राबवल्या व एक विकासाचे पर्व निर्माण केले व गावच्या विकासासाठी तळमळ असणारा ग्रामीण नेता म्हणून खानापूर पंचक्रोशीत   नावलौकिक मिळविला होता.

गावातील राजकारण करीत असताना त्यांनी नेहमीच खानापूरातील   होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, व तरुणांना मोलाचे सहकार्य ही केले होते.सोबत असणार्या अनेक बेरोजगारांना शासनदरबारी प्रयत्न करूण नोकर्या मिळवून दिले , अनेक कुटुंबांना शुन्यातून उभं केलं, गावातील व देगलूर तालुक्यावरील व जिल्हा पातळीवरील विविध राजकीय पदं त्यांनी भुषविली त्यात सरपंच, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर, अध्यक्ष मजूर फेडरेशन नांदेड, अध्यक्ष अखिल भारतीय कुल्लेकडगी समाज, संचालक आडत व्यापारी शिक्षण संस्था (देगलूर महाविद्यालय) अशा विविध क्षेत्रातील पदांचा समावेश होता,  मात्र कधीच पदअभिमान येऊ दिला नाही, कायम ग्राउंड लेवलवर राहूनच कार्य करण्याची कसब त्यांच्या अंगी होती ,अशाच त्यांच्या जीवनप्रवासात त्यांना कर्करोग या दुर्धर आजाराने ग्रासलं मात्र आपल्या अंगी असलेल्या लढवय्या वृत्तीने  त्यांनी कर्करोग व मधुमेह यासारख्या गंभीर आजारांना झुंज देत, हे दुर्धर आजार सोबत घेऊनही जनसेवा केली ,शेवटी या आजारांमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली आणि खर्या अर्थाने लढवय्या नेता  असलेले नारायणराव ताडकोले अनंतात विलीन झाले.अशा या व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन..
 मंगळवार दिनांक २९ मार्च रोजी त्यांचे प्रथम , पुण्यस्मरण दिन  असुन पुर्वसंध्येला म्हणजेच २८ मार्च सोमवारी सायंकाळी सुप्रसिद्ध  किर्तनकार ह.भ.प कृष्णा महाराज राऊत यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून खानापूर व परिसरातील जनतेने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ताडकोले कुटुंबियांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...