खानापूर येथे चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन...
देगलूर (खानापूर) दि 10 :-
शिवकुमार कल्याणी (खानापूर) लिंगायत TV live प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील खानापूर येथे हरीहर भजनी मंडळ,व सद्गुरू सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दि १२ रोज शनिवार रात्री ८वाजत ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या एकदिवसीय प्रवचन तथा दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील भक्तीमार्गाचा पुरस्कार करणा-या वारकरी सांप्रदायामध्ये देगलूरकर घराण्याचे नाव मोठ्या अदबीने घेतले जाते. २५० वर्षांपुर्वी गुंडामहाराज देगलूरकर यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांचे वंशज चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज व गुरुराज महाराज देगलूरकर २१ व्या शतकामध्येही समर्थपणे सांभाळत भक्तीमार्गाचा प्रचार व प्रसार करीत आहेत.
देगलूरकर घराण्याने कीर्तन, प्रवचन,चक्रीभाजन, वारी, प्रवचन, चातुर्मास सेवा आणि लेखनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात वारकरी सांप्रदायाचा खूप मोठा प्रसाराचे अतुलनीय कार्य केले आहे.
यामुळे आपल्या अभंगवाणीने व प्रवचनाने भक्तगण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्या प्रसिद्ध प्रवचन तथा किर्तनकार ह भ प चंद्रशेखर महाराजांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ खानापूर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन हरिहर भजनी मंडळ व सद्गुरू सेवा समिती तथा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आले आहे .
No comments:
Post a Comment