Tuesday, March 15, 2022

गायीच्या वासराचा नामकरण सोहळा दिमाखात संपन्न


गायीच्या वासराचा नामकरण सोहळा दिमाखात संपन्न 
.
खानापूर ( देगलूर
 दि.15...लिंगायत टिव्ही साठी शिवकुमार कल्याणी खानापूर देगलूर
खानापूर ( देगलूर) येथील शेतकरी मारोती मारज वाडे व त्यांची पत्नी या दांपत्याने आपल्या लाल कंधारी जातीच्या सोनी गाईने नुकताच काही दिवसापूर्वी एका गोंडस वासराला जन्म दिला होता.
..ज्या प्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्या वासराचे बारसे स्वतःच्या घरच्या आवारात मंडप घालून पाळणा सजवला.त्या दिवशी त्यांनी आपल्या सोनी गाईला व तिच्या वासराला स्वच्छ आंघोळ घालून सजवले व तिची विधिवत पूजा करून नामकरण सोहळ्यासाठी तयार केले.त्यानंतर वासराला छान सजविलेल्या पाळण्यात ठेवून सुवासिनी महिलांकडून घुगऱ्या व पेढे वाटून पाळणा गीते म्हणण्यात आली. व वासराचे नाव  ' बसवण्णा ' ठेवण्यात आले.नंतर सर्व शेजारी व आप्तेष्टांना गोडधोड अन्नदान करण्यात आले.त्यामुळे संपूर्ण खानापूर मध्ये या वासराच्या बारशाची लगबग पहायला मिळाली.
..या  बारसे उपक्रमामुळे भूतदयेचा एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.या मारजवडे दांपत्याला पूर्वीपासून पशुधना चे संगोपन करण्याचा छंद आहे.दरवेळी आपल्याला दूध देवून आपले पोषण करणाऱ्या व कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यांनी या बारसे सोहळ्याचे आयोजन केले.
..पूर्वीच्या काळी शेतीसाठी बैलांची मागणी मोठ्या प्रमाणात असायची हे बैल सांभाळण्याचा खर्च खूप मोठा येत असे.आता शेतीचे यांत्रिकीकरण झाले असून या बैलांचा वापरच राहिला नाही.त्यामुळे  हे पशुधन काळाच्या ओघात नामशेष होईल का काय ? अशी भीती वाटून राहिली आहे.या गोधन..पशुधन वंशाची जोपासणूक होणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी देशी गाईचे महत्त्व ओळखून गोपालन करण्याची गरज असल्याचे श्री.मारोती मारज वाडे यांनी यावेळी सांगितले.
..दरम्यान आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे जनावरांना देखील जीव लावणारे कुटुंब नव्याने पहायला मिळाल्याची भावना खानापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...