लिंगायत धर्म महासभा मेळावा आणि शाखा फलकाचे अनावरण उस्थाहात संपन्न
मिरज दि 7 :- सौ राणी खिलारे प्रतिनिशी लिंगायत TV live
म्हैसाळ ( ता. मिरज )येथे लिंगायत धर्म महासभा मिरज तालुका कार्यकारणी मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी येथील मुख्य आबासाहेब शिंदे चौकात लिंगायत धर्म महासभा शाखा फलकाचे अनावरण महिला राज्याध्यक्षा श्रीमती वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर येथील सनबे आण्णा हॉलमध्ये कार्यकारणी मेळावा संपन्न झाला.
प्रारंभी महात्मा बसवेश्वर प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यास अध्यक्षस्थानी आप्पासो चौगुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लिंगायत धर्म महासभा महिला राज्याध्यक्ष श्रीमती वैशाली दिलीप पाटील, राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील, जिल्हाध्यक्ष राहुल बापू कोठावळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. रश्मी अशोक चौगुले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता नंदकुमार कोरे, लिंगायत धर्म महासभेचे मिरज तालुका अध्यक्ष सोमनाथ माळी, महिला तालुकाध्यक्षा श्रीमती जयश्री दीपक खिलारे, जिल्हा सचिव प्रमोद शेटे, जिल्हा कोअर कमिटी सदस्य कमिटी सदस्य धोंडीराम मगदूम, मिरज शहराध्यक्ष जितेंद्र ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावेळी लिंगायत धर्म महासभेच्या महिला व पुरुष विभागात शाखाध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच कोअर कमिटी सदस्य निवडीची पत्रे देण्यात आली.
राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील यांनी लिंगायत धर्म संविधानिक मान्यता, अल्पसंख्यांक दर्जा याविषयी प्रशासकीय कार्याची माहिती दिली. सध्या केंद्र सरकारकडे याविषयी लिंगायत धर्म महासभेचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात दिल्लीपासून बेंगलोर पर्यंत अनेक प्रशासकीय अधिकारी तसेच धर्म मान्यता चळवळीत कार्य करणाऱ्या बऱ्याच अधिकारी, कार्यकर्त्यांचेबरोबर चर्चा केली असल्याचे बी. एस. पाटील यांनी सांगितले.
या कार्यात प्रत्येक गावचा सहभाग नोंदविण्यासाठी प्रत्येक गावामध्ये लिंगायत धर्म महासभा शाखा कमिटी स्थापन करावी असे आवाहन करण्यात आले.
सध्या जैन, शीख समाजाला ज्या निकषांवर अल्पसंख्यांक दर्जा मिळाला आहे ते सर्व निकष लिंगायत समाज पूर्ण करू शकत असल्याने योग्य रीतीने प्रशासकीय कार्य पूर्ण केल्यास आपणास नक्कीच यश मिळणार असल्याचे बी. एस. पाटील यांनी सांगितले. त्यानंतर उपस्थितांनी हे मार्गदर्शन ऐकून अद्याप ज्या गावामध्ये नसेल तिथे शाखा कमिटी करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
स्वागत , प्रास्ताविक धोंडीराम मगदूम यांनी, आभार प्रदर्शन शाखाध्यक्ष गुरु संगलगे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संजय पाटील सर आणि महावीर देसाई सर यांनी केले
No comments:
Post a Comment