महाशिवरात्रीनिम्मित हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी
मायणी:-दि०१ :- प्रा अजय शेटे
मायणी येथील प्रसिद्ध प्राचीन काळातील हेमाडपंती शिव मंदिरात यंदा महाशिवरात्री निम्मित मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी झाली होती. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप शिवभक्तांकडून करण्यात आले.
दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा होतो. गेल्या दोन वर्षापासून देशावर ती कोरोना महामारी असल्यामुळे अनेक निर्बंधाना जनतेला सामोरे जावे लागले.याकाळात धार्मिक स्थळांवर दर्शनास बंदी घालण्यात आली होती.याकारणाने कोणतेही उत्सव साजरे केले गेले नाहीत. परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत आल्याने सरकारने निर्बंध शिथिल केल्याने महाशिवरात्रीचा यंदाचा उत्सव सर्वत्र मोठ्या आनंदात व भक्तिभावाने संपन्न झाला.
शिवभक्तांकडून प्रसादाचे वाटप
महाशिवरात्रीनिम्मित मंदिरास विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीत सजवण्यात आले होते.दरवर्षीप्रमाणे येथील शिवभक्त उमेशबापू पुस्तके,विजय परदेशी यांच्याकडून महाप्रसादाचा उत्कृष्टरित्या नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमास अमोल भिसे,मनोहर घाडगे,विजय भोंगाळे,रंगा साळुंखे,दत्ता पाटोळे,विशाल कांबळे,तानाजी पाटोळे,विक्रम भोंगाळे यांची साथ मिळाली.तर मंदिरातील पुजारी बाबुराव पाटोळे यांनी या धार्मिक कार्यकामाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य असे नियोजन केल्याचे दिसून आले.
विशेष चौकट - *कर्तव्यासोबत व धार्मिक संस्काराचीही जोपासना*
मायणी दुरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी महादेव मंदिरास भेट देत कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. आपल्या कर्तव्यासोबतच आपल्या धार्मिक परंपरेच्या संस्काराची जोपासना करीत आपले पती रमेश शिंदे यांचेसोबत महादेवाचे दर्शन घेतले.त्यांच्या या कृतीचे भाविकांनी कौतुक केले.
महाशिवरात्रीनिमित्त येणार्या भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करताना उमेश पुस्तके, विजय परदेशी व अमोल भिसे .
हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरास भेट देत महादेवाचे दर्शन घेताना पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर सोबत त्यांचे पती रमेश शिंदे.
No comments:
Post a Comment