Sunday, March 20, 2022

प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा साक्षात्कारी संत..श्री तुकाराम महाराज प्रा.अजय शेटे.वडूज.



प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा साक्षात्कारी संत..श्री तुकाराम महाराज 
प्रा.अजय शेटे.वडूज.

रविवार दि.20
 संत तुकाराम महाराज बीज..बीज म्हणजे मूळ..वारकरी संप्रदाय ज्या.बिजावर फोफावला..वाढला..समृध्द झाला.. तो संत तुकाराम यांच्या प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणा ऱ्या साक्षात्कारी तत्वज्ञानावर.संत तुकाराम हे देहूचे कर्म वाणी.एका सुखवस्तू कुटुंबात संत तुकारामांचा जन्म झाला.त्यांचे आडनाव अंबिले.. व पदवी मोरे.तीन भावांमध्ये तुकाराम मधले.थोरले बंधू विरक्त वृत्तीचे.त्यातच अचानक पणे अनेक आपत्ती या कुटुंबावर कोसळ ल्या.आईवडील वारले.थोरली वहिनी वारली.नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी वारली.आणि कर्जबाजारी होण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला..
..त्यामुळे संत तुकाराम हरी चिंतनात रममाण झाले.भाम गड डोंगरावर जाऊन ते आपली अभंग गाथा लिहू लागले.प्रपंचात आलेले सर्व चांगले वाईट अनुभव त्याच्या अभंगातून चित्रित झाले.त्यामुळे ते सर्वसामन्य जनांचे वाटू लागले. भागवत धर्माची पताका अंगावर घेवून त्यांनी जनजागृतीचे वादळ निर्माण केले.
..हेच देव आणि अध्यात्म भक्तीचे वादळ गेली साडे तीनशे वर्षे झाली तरी समाज मनावर गारुढ करून राहिले आहे.जमिनी पासून  आकाशाला गवसणी घालत ..समुद्राचा गहन पणा घेवून ..हिमालयाची उंची गाठत संत तुकारामांनी प्रपंच आणि परमार्थ साधत भक्ती कशी करावी .याची शिकवण आपणास दिली आहे..
..ज्या प्रमाणे देव आणि दानव यांच्या समुद्र मंथनातून निघालेले हलाहल श्री शंकरांनी प्राशन करून त्याचे अमृत बनविले.तसेच संसारातील सर्व दुःख पचवून संत तुकारामांनी श्री शंकर बनून  देव आणि अध्यात्म भक्तीचे तत्वज्ञान समाजात रुजविले.
..संत तुकारामांना प्रचलित पंडित आणि गावगुंड यांचा त्रास सोसावा लागला..पण त्यां च्या श्री  विठ्ठल भक्तीने त्यांना तारले.त्यांची अभंग गाथा इंद्रायणी ची जल परीक्षा देवून अबाधित राहिली .यातच संत श्री तुकाराम महाराज व त्यांची अभंगगाथा यांचे महान महात्म्य जाणवून येते .
..मन हा मोगरा..अर्पूनी ईश्वरा..पुनरपि संसारा येणे नाही..
हे सत्य वेळेत समजून घेवून सर्वांनी वेळे त हरी चरणात लिन होण्याचा महान संदेश देवून संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले...
..श्री राम कृष्ण हरी..पांडुरंग हरी ..जय हरि विठ्ठल..जय विठू माऊली ..

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...