समता पतसंस्थेची आर्थिक प्रगती उच्च श्रेणीत
सातारा, दि.1- प्रा.अजय शेटे,
लिंगायत लोकनेते व महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे शासकीय सदस्य व समता पतसंस्था ,कोपरगाव चेअरमन मा.काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली समता पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या मार्च 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्ष अखेरीस उत्तुंग आर्थिक भरारी घेवून उच्च मानांकन श्रेणीत टिकून राहण्याची किमया साध्य केली आहे.
या गत आर्थिक वर्षात संस्थेने 662 कोटी रुपयांच्या ठेवी , 526 कोटींचे कर्जवाटप,175 कोटींची गुंतवणूक,725 कोटींचा निव्वळ नफा,1188 कोटी रुपयांचे समिश्र व्यवसाय व 171 कोटी रुपयांचे व्यावहारिक आर्थिक उद्दिष्ट्य साध्य करून उत्तम सफलता प्राप्त केली आहे.सोनेतारण व्यवहारात तर गतवर्षी 80% नी विक्रमी वाढ झाली असून संस्थेच्या या सर्व यशात सर्व सभासद,हितचिंतक व व्यवस्थापन यांचा सहभाग असून त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment