माजी पोलीस महासंचालक रामराव पवार यांचे निधन
सातारा दि 31:- प्रा अजय शेटे लिंगायत Tv live प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील चितळी या गावचे सुपुत्र व मुबई पोलीस दलामध्ये आपल्या अतुलनीय शौर्य पराक्र मा च्या जोरावर अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर पोहचलेले मा.रामराव पवार साहेब यांचे आज पहाटे 1.30 वा.पुणे येथील घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
चितळी गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले.अतिशय प्रामाणिक, सरळमार्गी,तत्वनिष्ठ व शिस्तबद्ध सेवक ते जगातील दोन नंबरचे समजले जाणाऱ्या मुंबई पोलीस दलातील उच्च अधिकारी अशी त्यांनी आपली नोकरीची कारकीर्द सतत चढत्या आलेखात ठेवून गाजवून सोडली.पोलीस दलातील त्यांच्या दराऱ्याची अंडरवर्ल्ड ला पण आदरयुक्त भीती वाटत असे.पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पोलिस महासंचालक कै.रामराव पवार ,काका हे ठाणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार साहेब यांचे वडील आहेत.त्यांचे पार्थिव आज दुपार पर्यंत त्यांच्या मूळ गाव चितळी येथे आणण्यात येणार असून सायंकाळी अंतिम अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांना गावाकडे सर्वजण काका या नावाने ओळखत असतं.
चितळी गावच्या सामाजिक..राजकीय..शैक्षणिक..दैवी कार्यात त्यांचे नेहमीच मोठे योगदान रहात असे..
त्यांच्या निधनाने चितळी सह खटाव तालुका व महाराष्ट्र पोलीस दल यांना धक्का बसला असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हिच परमेश्वर चरणी प्रार्थना लिंगायत TV live आणि समस्त लिंगायत समाज सातारा जिल्हा यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
No comments:
Post a Comment