Friday, February 23, 2024

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण            
                                                 सातारा दि 23  :-  प्रतिनिधी म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ, सातारा यांच्या वतीने नुकताच बसव भूषण पुरस्कार वितरण सोहळा सातारा येथे पार पडला.
त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष मा.ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते म्हणाले की,एक पुरुष शिकला तर तो शिक्षित होतो.पण एक स्त्री शिकली तर पुढची संपूर्ण पिढी शिक्षित होते.त्या प्रमाणे आपल्या लिंगायत समाजातील महिलांनी पण व्यवसायाच्या बाबतीत प्रगत आधुनिक ज्ञान घेवून स्वावलंबी होण्याच्या बाबतीत मागे राहू नये.त्यासाठी येत्या 10 मार्च ला तुळजापुर येथे व्यवसाय करण्यास लागणाऱ्या छोट्या मशिनरीचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.तसेच व्यवसाय करायला लागणाऱ्या कर्जासाठी आपल्या समाजातील बँका व पतसंस्था  सहकार्य करणार आहेत.

त्यासाठी महिलांनी तुळजापूर येथे येवून सर्व मशिनरी व त्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची माहिती घेवून व आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन सदर व्यावसायिक प्रदर्शनाचा लाभ उठवला पाहिजे .
तसेच समाजाच्या भल्यासाठी सर्व  स्त्री - पुरुषांनी समाजकार्यात हिरीरीने सहभागी होणे आवश्यक आहे.
यावेळी मा.प्रकाश शेठ गवळी,राजेंद्र घुटे, प्रदिप बापू वाले,नानासाहेब मेनकुदळे,मंडळाचे संस्थापक सागर शेठ कस्तुरे,नंदकुमार ( नंदूशेठ ) गुरसाळे,श्रीनिवास कामळे,सिद्धराज शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मा.भारतशेठ बारवडे यांना समाज भूषण, मा.दिलीप पिलके यांना सहकार भूषण , मा.राजेंद्र आटकेकर यांना उद्योग भूषण , मा.राजेंद्र लोखंडे यांनी कृषी भूषण  व मा.महालिंग मेनकुदळे यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले.रविवार दि.18 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माधव मेंडीगेरी व आभार प्रदर्शन  निर्मलाताई बारवडे यांनी केले.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.



Thursday, February 15, 2024

महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण.




महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण.
सातारा, दि.16 - 
रविंद्र वाकडे
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,सातारा यांच्या वतीने वितरित केला जाणारा सन  2024 सालचा  अतिशय प्रतिष्ठेचा  'बसव भूषण पुरस्कार ' रविवार,दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी संध्या.4 वा. प. पू.औंधकर मठ ,सातारा येथे समाजभूषण मा.भारत शेठ बारवडे , काव्य व साहित्य भूषण मा.महालिंग मेन कुदळे,सहकार भूषण मा.दिलीप पिलके, उद्योग भूषण मा.राजेंद्र आटकेकर व कृषी भूषण मा.राजेंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, विरशैव इंटरनॅशनल चे असोसिएशन चे अध्यक्ष तथा सहकार महर्षी मा.ओम प्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे,लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट चे संचालक मा.प्रकाश शेठ गवळी सावकार, पेट्रोलियम उद्योजक मां.राजेंद्रशेठ घुटे,राष्ट्रीय लिंगायत संघ अध्यक्ष मा. प्रदिपबापू वाले या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.

तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन निमंत्रक संस्थापक अध्यक्ष सागर कस्तुरे,उपाध्यक्ष श्रीनिवास कामळे,सचिव महादेव मेंडीगिरि,कोषाध्यक्ष ॲड. सिद्धराज शेटे ,संचालक सदस्य नंदकुमार गुरसाळे, किरण लखापती,सुभाष ताटे, सौ. निर्मलादेवी बारवडे ,वीरशैव लिंगायत समाज,सातारा महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती नंदाताई चिंचकर,बसव विचार निमंत्रक अक्षय विघ्ने यांनी केले आहे.

Friday, September 8, 2023

म.बसवेश्वर महामंडळाला स्वायत्त दर्जा बहाल.मा.ओमप्रकाश तथा काका कोयटे.


म.बसवेश्वर महामंडळाला स्वायत्त दर्जा बहाल.मा.ओमप्रकाश  तथा काका कोयटे.
म.बसवेश्वर महामंडळाला स्वायत्त दर्जा बहाल.मा.ओमप्रकाश  तथा काका कोयटे.
सातारा, दि.9 - रवींद्र वाकडे
लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या मागणीप्रमाणे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाला स्वायत्त दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य  मंत्रिमंडळाने कालच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष  मा.ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी, कार्याध्यक्षा  मा.सरलाताई पाटील यांनी सांगितले.
 महात्मा बसवेश्वर महामंडळाला स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे आता वीरशैव लिंगायत समाजातील सरसकट सर्वच पोटजातींना या महामंडळाचा लाभ मिळणार आहे. विशेषत: शैक्षणिक, व्यावसायिक कर्जासाठी सर्व पोटजातींना या महामंडळाचा लाभ होणार असल्याची माहिती व्हायाचे युवा आघाडीचे अध्यक्ष मा.प्रदीपजी  साखरे, लिंगायत संघर्ष समितीचे महासचिव मा.भगवान कोठावळे यांनी दिली.
हा स्वायत्त दर्जा मिळण्याची मागणी मा.हसन मुश्रीफ साहेब  यांच्याकडे लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा मा.सरलाताई पाटील आणि मा.बसवराज वंजारी यांनी केली होती. त्यामुळे मा.  मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब  यांचे व महाराष्ट्र शासनाचे वीरशैव लिंगायत समाज बांधवांकडून आभार मानण्यात येत आहेत.

Wednesday, June 28, 2023

वडिलोपार्जित व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी आज आहेत 5 हजार वाहनांचे मालक.



वडिलोपार्जित व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी आज आहेत 5 हजार वाहनांचे मालक

वडिलोपार्जित व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी आज आहेत 5 हजार वाहनांचे मालक .
सातारा, दि.28  : रविंद्र वाकडे
भारतात ध्येय व कठोर परिश्रम करून बिझनेसमध्ये यशस्वी झालेले अनेक जण आहेत. शून्यातून सुरुवात करणारे असेच एक उद्योगपती म्हणजे व्हीआरएल लॉजिस्टिक्सचे मालक विजय संकेश्वर.
वडिलोपार्जित व्यवसाय सोडून स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभारण्याची त्यांची कहाणी खूप रंजक व प्रेरणादायी आहे.

 देशातील 'ट्रकिंग किंग' म्हणून ओळखले जाणारे विजय संकेश्वर यांचा प्रवास जाणून घेऊयात. या संदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलंय. 1976 मध्ये सुरू केलेला व्यवसाय देशातील आघाडीच्या लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या यादीत सर्वात वर व्हीआरएल लॉजिस्टिक्सचं नाव येतं.
आज कोट्यवधींची उलाढाल असलेली ही कंपनी इतक्या सहज उभारली गेली नव्हती. या मागे अनेक वर्षांची मेहनत आहे. व्हीआरएल लॉजिस्टिक्सचे संस्थापक विजय संकेश्वर यांच्याजवळ आज जवळपास 5,000 कमर्शियल वाहनं आहेत. इतक्या वाहनांमुळे कंपनीचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं.

या कंपनीची स्थापना विजय संकेश्वर यांनी एक ट्रक घेऊन 1976 मध्ये केली होती.
कौटुंबिक व्यवसायात मन रमलं नाही .विजय यांनी कौटुंबिक व्यवसाय सोडून नवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना घरातून विरोध झाला. त्यांच्या कुटुंबाचा प्रिंटिंग प्रेस बिझनेस होता.

विरोध पत्करून त्यांनी नवा बिझनेस उभारला आणि आज त्यांच्या कुटुंबालाही त्यांचा अभिमान आहे. उधार पैसे घेऊन सुरू केला व्यवसाय कौटुंबिक व्यवसाय सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी कुटुंबियांकडून आर्थिक मदत घेतली नाही, तर ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उधार घेऊन एक ट्रक घेतला व काम सुरू केलं. व्यवसायात आल्यावर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, आर्थिक समस्याही आल्या, पण त्यावर त्यांनी मात केली आणि 90 च्या दशकात त्यांना यश मिळू लागलं. एका ट्रकने सुरू केलेला व्यवसाय 150 ट्रकवर येऊन पोहोचला होता.
ट्रकिंग किंगच्या जिवनावर बनला चित्रपट सुरुवातीच्या टप्प्यात या व्यवसायात टेक्नॉलॉजी आणि दळणवळणाचा अभाव हे सर्वात मोठे अडथळे होते. यासोबतच लॉजिस्टिक्सचा व्यवसायही संघटित नव्हता.
पण, 1990 नंतर त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढू लागला. मग त्यांनी विजयानंद ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सुरू केली. पुढे त्याचं नाव बदलून VRL Logistics ठेवलं. आता ही कंपनी जेट सर्व्हिसेसही पुरवते.
विजय यांच्या प्रवासावर कन्नड भाषेत 'विजयानंद' नावाचा चित्रपट 2022 प्रदर्शित झाला होता. कंपनीच्या शेअरने 5 वर्षांत दिले 115% रिटर्न एका रिपोर्टनुसार, संकेश्वर यांची एकूण संपत्ती 70 कोटी रुपये आहे. व्हीआरएल लॉजिस्टिकचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहेत आणि शेअर बाजारातील व्यवहारांदरम्यान सोमवारी 716.00 रुपयांच्या किमतीवर बंद झाले. गेल्या पाच वर्षांतील या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी पाहिली तर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 115.05% रिटर्न दिले आहेत. या लॉजिस्टिक कंपनीची मार्केट कॅप आज 6200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Wednesday, June 21, 2023

लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती.




लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती.

लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती.
सातारा, दि.22 -  लिंगायत संघर्ष समितीचे  समन्वयक लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष श्री सुनीलशेठ रुकारी  यांच्या आदेशाने  बीड जिल्हा लिंगायत संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक नेते,जेष्ठ पत्रकार श्री. आत्मलिंगजी शेटे  यांची निवड करण्यात आली. त्यांना लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष श्री राजाभाऊ मुंडे  यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी  युवा नेते सागर मुंडे, प्रथितयश व्यापारी निलेश होनराव, वैजनाथ गुळवे  यांची विशेष उपस्थिती होती.
समाजाच्या प्रत्येक कामात हिरीरीने सहभागी असणारे धडाडीचे नेते श्री .आत्मलिंगजी शेटे  यांना  लिंगायत  संघर्ष  समितीचे युवा नेते  मा.प्रदिपजी साखरे यांनीही विशेष शुभेच्छा देवून  त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

Sunday, June 11, 2023

वीरशैव लिंगायत समाज , कोल्हापूरच्या वतीने स्नेह मेळावा उस्थाहात संपन्न,



वीरशैव लिंगायत समाज , कोल्हापूरच्या वतीने स्नेह मेळावा उस्थाहात संपन्न,
वीरशैव लिंगायत समाज , कोल्हापूरच्या वतीने स्नेह मेळावा उस्थाहात संपन्न,
सातारा, दि.12 - रवी वाकडे
 वीरशैव लिंगायत समाज,आणि कोल्हापूर युवा आघाडी यांच्या वतीने येथे आयोजित  केलेल्या स्नेह मेळाव्यास लिंगायत समाजातील युवावर्ग आणि इतर  मान्यवर यांची उपस्थिती लाभली. हा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहाने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. 
हा स्नेह मेळावा हॉटेल रेडियंट येथे  शनिवार दिनांक 10/6/2023 रोजी आयोजित केला होता. समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे साहेब ,युवा नेतृत्व केतन तवटे, चंद्रकांत नासिपुडे,  राजू वाली, राहुल नष्टे ,अमित झगडे, शिरीष साबणे, निखिल सावर्डेकर, आणि लिंगायत युवा समाज बांधव यांच्या आव्हानानुसार आयोजित केलेल्या  या लिंगायत समाजाच्या स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात लिंगायत समाज कसा प्रगतशील होईल आणि समाजात एकजुट निर्माण होईल याकरता आवश्यक गोष्टी ची चर्चा झाली. यावेळी अनेक चांगल्या सूचना मांडण्यात आल्या. या मेळाव्यास लिंगायत समाजातील विविध क्षेत्रातील उद्योजक व  मान्यवर उपस्थित होते. स्नेह मेळाव्यातील छायाचित्रण  चेतन शेटे यांनी कॅमेराबद्ध केले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता.

Tuesday, June 6, 2023

हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाज बांधव मागण्यासाठी रस्त्यावर. भारत देशा जय बसवेशा या घोषणाने शहर दुमदुमले ,

 हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाज  बांधव मागण्यासाठी  रस्त्यावर.भारत देशा जय बसवेशा या  घोषणाने शहर दुमदुमले ,

 



हैदराबाद येथील लिंगायत महामोर्चात लाखो समाज  बांधव मागण्यासाठी  रस्त्यावर.भारत देशा जय बसवेशा या  घोषणाने शहर दुमदुमले ,


सातारा  दि. ४ जून 

लिंगायत धर्माला स्वतंत्र संवैधानिक मान्यता, अल्पसंख्यक दर्जा, विविध राज्यात ओबीसी आरक्षण या प्रमुख मागण्यासाठी लिंगायत महामोर्चा आयोजित केली होती. तेलंगणा राज्यातील पहिली महारैली अभूतपूर्व यशस्वी झाली. बीदर पासून मुंबई महामोर्चा पर्यंत २३ महामोर्चा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. २४वी हैद्राबाद महामोर्चा  तेलंगाना राज्यात असल्यामुळे कन्नड,मराठी आणि तेलगू माध्यमाचा सर्रास वापर झाला.





महामोर्चाची सुरवात जगद्गुरु चन्नबसवण्णा स्वामीजी  बंगळुरू यांचे हस्ते प्रथम महात्मा बसवण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली.नंतर धर्म ध्वजारोहण करण्यात आले. बसव धर्मपिठाच्या  द्वितीय महिला जगद्गुरु गंगा माताजी यांनी दीपप्रज्वलन केले.याप्रसंगी  जगद्गुरु बसवलिंग पटदेवरू भालकी, जगद्गुरु हुलसुर आप्पाजी, माता गंगाबिका,  परमपूज्य बसव प्रभू महास्वामी, जगद्गुरु सिद्धरामेश्वर महास्वामीजी बसवकल्याण आदी सह  कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध मठाधीश तसेच हैदराबाद महामोर्चा चे संयोजक शंकर पटेल, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर,राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे, राष्ट्रीय बसव दलाचे अध्यक्ष बसवराज धनुर, श्रीकांत स्वामी, लिंगायत धर्म महासभेचे बी एस पाटील, सांगलीचे प्रदीप वाले, लातूरचे सुनील हेंगणे, वर्ध्याचे कैलास वाघमारे,जतचे तुकाराम माळी, बसव ब्रिगेडचे सिद्धेश्वर औरादे,बसवेश्वर हेंगणे, चन्नम्मा ब्रिगेडचे अध्यक्ष शितल महाजन,नांदेडचे पिंटू बोंबले,कुराडे,सोलापूरचे  राधाकृष्ण पाटील, नागेश पडनुरे,आदी उपस्थित होते




              कर्नाटक राज्याचे  मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे विश्वगुरू बसवण्णां यांचे अनुयायी असून ते  कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अधिकार पदी आल्याबरोबर त्यांनी कर्नाटक राज्यातील सरकारी कार्यालयात विश्वगुरू बसवण्णा यांचे फोटो लावण्याचे आदेश काढून अमलबजावणी केली. आणि लिंगायत धर्माला केंद्र सरकारकडून  स्वतंत्र संवैधानिक मान्यता मिळण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने  उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. त्या आयोगाने सखोल संदर्भांचा अभ्यास करून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची शिफारस कर्नाटक राज्य सरकारला केली. कर्नाटक राज्य सरकारने ती शिफारस राज्याचे मंत्री मंडळ बैठकीत मंजूर करुन केंद सरकारला लिंगायत धर्माला त्वरीत स्वतंत्र संवैधानिक मान्यता द्यावी म्हणून शिफारस केली. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राज्य मंत्रिमंडळात सर्व मागण्या मान्य करून  तात्काळ केंद्राकडे शिफारस करावे अशी मागणी जगद्गुरु चेन्नबसवानंद महास्वामीजी यांनी केले आहे.

 या महामोर्चास  केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा माजी केंद्रीय मंत्री, किशन रेड्डी  खासदार जनार्दन रेड्डी,  आमदार ती राजा सिंग, तेलंगणा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी माणिकराव ठाकरे  आधी सह आजी-माजी खासदार यांनी भेट दिली. मोर्चा  यशस्वी करण्यासाठी  तेलंगणा लिंगायत समन्वय समितीचे श्री मधु,श्री  विजयकुमार पटणे,भीमराव  बिरादार आदी सह विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेतले.

Saturday, June 3, 2023

वीरशैव इंटरनॅशनल (व्हाया) लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न . उद्घाटन ते बक्षिस वितरण सोहळ्याची सर्व नेत्रदिपक क्षणचित्रे .

 वीरशैव  इंटरनॅशनल (व्हाया)  लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न .

 उद्घाटन  ते बक्षिस वितरण सोहळ्याची  सर्व  नेत्रदिपक क्षणचित्रे .




वीरशैव  इंटरनॅशनल (व्हाया)  लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न .

 उद्घाटन  ते बक्षिस वितरण सोहळ्याची  सर्व  नेत्रदिपक क्षणचित्रे .



सातारा, दि.3 - 

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया) व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र आयोजित व व्हाया चे अध्यक्ष लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे, लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय व्हाया लिंगायत प्रिमीयर लीग या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे 20 जिल्ह्याच्या 12 टिमने आपला सहभाग नोंदविला,


या लिगच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते मा .खा .चंद्रकांतजी खैरे साहेब,मा. आ. ‌राहूलजी बोंन्द्रे , राजाभाऊ आबा मुंडे, शिवाजी अप्पा कपाळे, रवींद्रजी कानडे, ओंकार खुरपे, गणेशजी भोरे, तसेच नगर, नासिक, संभाजीनगर, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई, लातूर, कोकण, सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते .



ऐतिहासिक व अतिशय उत्साहवर्धक झालेल्या या स्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट सांघिक खेळ केला .त्याबद्दल सर्वांचेच हार्दिक अभिनंदन होत आहे.या सामन्या मध्ये कोकण संघाने विजेतेपद ,एक लाख रुपये बक्षीस व विश्वेश्वर चषक जिंकला तर सोलापूर संघाने उपविजेेते पद पटकावून 50 हजार रुपये चे बक्षिस मिळविले.



ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्हाया लिंगायत प्रिमीयर लिग महाराष्ट्र चे अध्यक्ष, व्हाया युथवींग अध्यक्ष  मा.प्रदिपजी साखरे, लिंगायत संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. चंद्रशेखर दंदणे,




भगवान कोठावळे, सौरभ दंदणे, क्रीडा संघटक नितीनजी हिंगमिरे, समता इंटरनॅशनल स्कूलचा‌ सर्व  स्टाफ यांनी परिश्रम घेतले.



लिंगायत समाजाच्या क्रिकेटच्या इतिहासात एक नव्या पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.असेच यावेळी सर्व मान्यवर व खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले.

Tuesday, May 30, 2023

पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.

 पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.





 पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर 
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.



सातारा, दि.30 -  
राणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी  या गावात झाला.त्यांचे वडील व्यंकोजीराव शिंदे हे माळवा प्रांत साम्राज्याचे पाटील होते.त्यावेळी मुलींना शिक्षणास बंदी होती.परंतु अहिल्याबाई यांना त्यांच्या  वडीलांनी शिक्षण दिले.त्या लहानपणापासून अतिशय आदर्श व कुटुंबांचे संस्कार घेवून समाजसेवेत अग्रेसर होत्या.
एकदा इंदोर संस्थानचे राजे मल्हारराव होळकर हे माळवा प्रांतात आले असता ते' छावणी' या गावी आले.त्यावेळी तेथील श्री शंकराच्या मंदिरासमोर आठ वर्षाची एक लहान मुलगी गरीब लोकांना अन्नदान करत होती.तिचे ते कार्य पाहून त्यांनी अधिक चौकशी केली असता ती अहिल्या असल्याचे त्यांना समजले.तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना आपला राजपुत्र मुलगा खंडेराव याचे साठी तिला लग्नाची मागणी घातली.


आणि वयाच्या फक्त आठव्या वर्षी अहिल्या इंदोर संस्थान ची राणी बनली.
तिथून पुढे सलग वीस वर्षे त्यांच्या संस्थान ची खूप भरभराट झाली.
    परंतु त्यानंतर ई. स.1754 च्या एका घनघोर युद्धात त्यांचे पती खंडेराव यांना वीरमरण आले. त्यावेळी 'सती 'जाण्याची प्रथा  अस्थित्वात होती.त्यांनी त्यासाठी तयारी पण केली होती.परंतु प्रगत विचाराचे सासरे मल्हारराव यांनी पहिल्यांदा विरोध करून त्यांना सती जाण्यापासून रोखले.त्यानंतर  बरोबर बारा वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव हे इ. स.1766 मध्ये निर्वतले.त्यामुळे सन 1767 मध्ये स्वतः अहिल्याबाई होळकर यांनी राजमुकुट परिधान करून त्या इंदौर संस्थानच्या महाराणी बनल्या.सन 1767 ते सन 1795 पर्यंत त्यांनी इंदोर संस्थानचे नाव संपूर्ण भारत वर्षात गाजवून सोडले.
त्या अतिशय देवभक्त व न्यायप्रिय होत्या.सर्वांना त्या समान न्यायदान करत असत. राजा व प्रजा असा वेगळा भेदभाव त्यांनी कधी केला नाही.त्याबाबत एक कथा त्यांची सम न्यायदानाची पद्धत सांगून जाते.
त्यांचा मुलगा असलेला युवराज मालोजीराव याने इंदोर शहरात वेगाने घोडा रथ चालवून एका गायीच्या वासरास धडक दिली व तो वेगाने निघून गेला.यात वासरू जागेवरच गतप्राण झाले.त्यामुळे तीची आई गाय विव्हल अवस्थेत तिथेच बसून राहिली.सर्व प्रजा गर्दी करून हे दृश्य पहात होती.थोड्याच वेळात तेथून महाराणी अहिल्याबाई यांचा रथ आला.त्यावेळी अधिक चौकशी केली असता त्यांना त्यांच्या पुत्राचा पराक्रम समजला.त्यांनी त्या वासराच्या अंत्यसंस्काराची सोय करून त्या गोमातेस स्वतःच्या गोशाळेतून पालन पोषण आहार देण्यास सांगितले व त्या तडक राजदरबारात आल्या.त्यांनी युवराज मालोजीराव यांच्या पत्नी सूनबाई यांना बोलावून विचारले की,अशा प्रकारचा अपराध केला तर त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची शिक्षा करावी.त्यावर सूनबाईनी सांगितले की,त्याला सरळ कडक देहदंडाची शिक्षा देण्यात यावी .त्याबरोबर त्यांनी प्रधान व शिपाई याना पाठवून मालोजीराव यांना कैदी बनवून पकडुन आणले व देहदंडाची शिक्षा सुनावलीआणि जिथे ते वासरू मरण पावले होते त्याच चौकात हातपाय दोरखंडाने बांधून मालोजीराव यांना आणून टाकले. व घोडागाडी वेगाने अंगावर घालण्यास सांगितले.परंतु त्या अश्वरथास चालविण्यासाठी कोणीही सारथी तयार झाला नाही.हे पाहून स्वतः त्या रथामध्ये  बसल्या व रथ चालवू लागल्या.त्यावेळी तीच गाई त्या रथाला वारंवार आडवी येवू लागली व तिने अहिल्याबाईंना रोखले.हा चमत्कार पाहिल्यावर प्रधान मंडळींनी त्यांना शिक्षेत बदल करण्याची विनवणी केली.त्यामुळे नाईलाजाने त्यांनी मालोजीराव यास नगरातून बाहेर काढले व त्याचे युवराज म्हणून असलेले सर्व अधिकार काढून टाकले. ही दंतकथा ज्या चौकबाजारात  घडली त्याला त्यामुळेच 'आडा बाजार '  असे नाव पडले आहे.  ही घटना अहिल्याबाई महाराणी झाल्या त्या नंतर एकाच वर्षात घडली. त्यामुळे आई व पत्नी यांचेपासून दूर राहावे लागले मुळे पुढे  दुखी मनाने खचून अतिशय बिकट अवस्थेत मालोजीराव त्याच वर्षी मरण पावले.अशा प्रकारे ओळीने पती,सासरे व त्या नंतर एका वर्षात पोटचा मुलगा मरण पावल्याचे दुःख पचवून त्यांनी इंदोर संस्थान चा राज्यकारभार मोठ्या जिद्दीने चालू ठेवला.

एक स्त्री ही इंदोर संस्थान चा राज्यकारभार पहात आहे.हे पेशवे साहेबांना योग्य वाटत नव्हते.त्यांनी इंदोर संस्थानच्या वेशीवर सैन्य नेवून इंदोर संस्थान वर पुरुष राजा बसवण्याचा आग्रह धरला.परंतु  त्यांनी आपले सेनापती तुकोजीराव यांना पेशवे सरकार यांचे कडे पाठवून एक पत्र त्यांच्या स्वाधीन केले.त्या मध्ये लिहले होते की, माझ्या वडिलांनी मला बंदी असताना  पण शिक्षण दिले,माझे सासरे यांनी मला' सती 'जाण्यापासून रोखले.दोघेही स्त्री चा आदर करणारे होते.समानता मानणारे होते.त्यामुळेच मी स्त्रियांचे सैन्य उभे करू शकले.आपण जबरदस्ती करून मला पायउतार कराल तर आमचे स्त्रियांचे सैन्य तुमच्याशी युद्ध करेल.जर त्यात तुम्ही जिंकला तर एका दुःखी स्त्रीचे राज्य हिसकावून घेतले असे दूषण तुम्हाला लागेल.आणि जर आम्ही जिंकलो तर हा अपमान  तुम्ही पचवू शकणार नाही.असे टोचणारे शब्द ऐकल्यावर पेशवे सैन्याचा विचार बदलला व त्यांनी आम्ही फक्त  तुमच्या शोक दुःखात सामील होण्यास आलो आहोत असे म्हणून त्यांनी महाराणी अहिल्याबाई यांची गाठ घेतली व दुखवटा काढून ते आल्या पावली माघारी फिरले.
      अहिल्याबाई या परकीय यावनी सत्तेपासून आपले राज्य सुरक्षित रहावे म्हणून सदैव तत्पर असत.त्यासाठी त्यांनी भगवान श्री शिवशंकराची उपासना करून आपले मनोसामर्थ्य प्रचंड वाढवले.श्री महादेवावर त्यांची खूप श्रद्धा होती त्यामुळे त्या नेहमी त्याची भक्ती करत.त्यांनी आपल्या राज्यात महेश्वर व इंदोर येथे अनेक मंदिरे बांधली.तसेच  सोमनाथ सह अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्यालाच सध्या ' जुने सोमनाथ ' किंवा ' अहिल्याबाई मंदिर ' असे म्हणतात.धर्मशाळा बांधल्या,शिक्षणाची सोय केली,पाण्यासाठी मोठ्या विहिरी खोदल्या.पूजापाठ संस्कार केंद्रे उभारली. लष्करी शिक्षण देवून स्त्री सैन्याची पलटण उभी केली.

                                
श्री भगवान शिवशंकरा प्रती असलेल्या भक्तिभावामुळे त्यांचा राजपत्रात व राजआज्ञेत  सर्वात शेवटी स्वतःच्या मोहोर व स्वाक्षरी ऐवजी 'श्री शिव शंकर ' अशी नोंद त्या करत असत .त्यांनी छापलेल्या नाण्यांवर श्री शंकर, श्री नंदी,बेलपत्र यांची अनेक प्रकारची चित्रे होती.
अतिशय भक्तिभावाने त्यांनी आपले राज्य चालवले.सुशासन,दूरदर्शी कारभार पारदर्शक कारभार पद्धत यामुळे त्यांची कारकीर्द खूप गाजली. "आपल्या राज्याची सर्व संपत्ती ही श्री परमेश्वराची असून आपण फक्त तिचे राखणदार आहोत "असे त्या मानत. दि.31मे  रोजी त्यांची 297 वी जयंती पार पडत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास व आदिवासी विकास मंत्री  मा.ना.आण्णासाहेब डांगे ,इस्लामपूर यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर लिहलेले 'पुण्यश्लोक मातोश्री महाराणी साहेब - देवी अहिल्याबाई होळकर '  हे पुस्तक सर्व इतिहास प्रेमी,स्पर्धा परीक्षा अभ्यासक,  तसेच राजकीय ,सामाजिक रसिक वाचक यांनी जरूर वाचावे व आपल्या जीवनात त्यांच्या राजकारभार तत्वांचा अंगीकार करावा येव्हढीच त्यांच्या 298 व्या जयंती निमित्त माफक अपेक्षा. त्याच्या पराक्रमी कर्तुत्वाला त्रिवार वंदन . जय देवी अहिल्याबाई - जय शिव शंकर.  


मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

 मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन 



 मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन 






कराड , दि.30 - रविंद्र  वाकडे 

 लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असणारे महाराष्ट्र राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व , माजी मंत्री तथा आमदार मा.विनयजी कोरे ( सावकर) साहेब यांचा तमाम लिंगायत समाजाच्या वतीने बुधवार दि.31 मे 2023 रोजी , सायं.5 वा.हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक,सोलापूर येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बसव ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अविनाश भोसीकर ( भाऊ ),प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे लिंगायत नेते मा. पी.संगमेश्वर, मा. वेण्णा ईश्र्वराप्पा  हे लाभणार आहेत.

तसेच मा. राज्यमंत्री व आ.विजयकुमारजी देशमुख, मा. आ.प्रणितीताई शिंदे,जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ चे चेअरमन मा.शिवाजी सावंत साहेब, जि. प.सदस्य  मा.अमरजी पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे मा.संतोषभाऊ पवार, युवा नेत्या मा.शितलताई म्हेत्रे, मा. स्वागताध्यक्ष खलीलभाई शेख,मा.डीपीडीसी सदस्य जुबेर बागवान, एम.के.फाऊंडेशनचे मा.महादेवजी कोगणुरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बसव ब्रिगेड प.महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.संतोषजी वायचळ,निमंत्रक बसवब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष मा.अमित राजशेखर रोडगे हे असून ,सदर कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहून या सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Saturday, May 27, 2023

तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP शिवम विसापूरे .

 तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP  शिवम  विसापूरे .



             


तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP  शिवम  विसापूरे .




कराड दि २७   :- दिलीप महाजन 

कराड येथे शिवसेवा चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने चरेगाव (ता.कराड) येथील शिवम विसापूरे यांनी राज्यसेवा परीक्षेच्या निकालात डीवायएसपी म्हणून यश मिळल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.कराडचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे अध्यक्षस्थानी होते. माजी नगरसेवक विनायक विभूते, अनिल खुंटाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे, उदय हिंगमिरे, नंदकुमार नवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विसापूरे म्हणाले, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. पण हे शिक्षण सुरू असतानाच मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. या परीक्षा मी देत गेलो. गतवर्षी माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली असून त्याचे ट्रेनिंग सध्या सुरू आहे. तर यावर्षी डी वाय एस पी म्हणून माझी निवड झाली आहे. असे यश चिकाटीने अभ्यास केल्यास इतर विद्यार्थीही मिळवू शकतात .आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करायला नक्कीच तयार आहे.

 अरुण घाटे म्हणाले, खरंतर सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांची सेवा करण्यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. शिवम विसापुरे यांना तो मिळाला असून ते चांगली सेवा करतील असा आम्हाला विश्वास आहे.

प्रमोद सुकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात चरेगाव सारख्या ग्रामीण भागातील शिवम विसापूरे यांनी वयाच्या २५/२६ व्या वर्षी मिळवलेले यश हे इतरांना प्रेरणादायी आहे असे सांगितले.  विनायक विभुते यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप चिंचकर, सुनील महाजन, संजय शेटे, शिवानंद डुबल ,आनंद शेटे,राजेंद्र घाटे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास रामचंद्र लाकोळे, बाजीराव शेट्टी, राजू खलीपे, गणेश हिंगमिरे, बाजीराव शेटेनावर, दीपक जोते, प्रा. हेमंत शेटे, चंद्रशेखर नकाते, प्रमोद तोडकर, रेश्मा कोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

                  




कराड येथे स्पर्धा परीक्षेतून डीवायएसपी झालेल्या शिवम विसापूरे यांचा सत्कार करताना नंदकुमार बटाणे, विनायक विभूते, राजू शेटे,प्रमोद सुकरे आदी.




Thursday, May 25, 2023

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

 

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय  (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.



वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय  (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.



कोपरगाव , दि.26 -प्रतिनिधी

 वीरशैव लिंगायत समाजातील आंतरराष्ट्रीय संस्था असलेल्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन(व्हाया)च्या वतीने लिंगायत लोकनेते व्हाया चे अध्यक्ष मा.काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाया लिंगायत प्रिमियर लिग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोपरगाव येथे समता इंटरनॅशनल स्कूल च्या महात्मा बसवेश्वर क्रीडांगणावर केले असल्याची माहिती ' व्हाया युथवींग ' चे अध्यक्ष मा.प्रदिप साखरे यांनी दिली.





याबाबत पुढे अधिक माहिती देताना लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष श्री.भगवान कोठावळे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूलच्या महात्मा बसवेश्वर क्री डांगणावर २७ व २८ मे २०२३ रोजी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील  एकूण १२  संघ सहभागी होणार असून ,पुणे येथील विश्वेश्वर सहकारी बँक यांच्या कडून विजेत्या संघाला १ लाख रुपयांचे रोख बक्षीस व विश्वेश्वर चषक प्रदान करण्यात येणार आहे.तर उप विजेत्या संघाला लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष श्री.राजाभाऊ मुंडे यांच्या कडून ५१ हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.

तसेच या स्पर्धेतील  'मॅन ऑफ द मॅच' , ' मॅन ऑफ द सिरीज ' , उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट बॅट्समन या सारखी विविध बक्षिसे राहुरी येथील आदर्श पतसंस्थेचे चेअरमन श्री.शिवाजी आप्पा कपाळे, माजलगाव येथील मंगलनाथ पतसंस्थेचे चेअरमन श्री.रविंद्र कानडे, नाशिक येथील श्री.गणेश भोरे आदींनी जाहीर केली असल्याचे  लिंगायत संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.चंद्रशेखर दंदणे यांनी सांगितले.

समाजातील तरुणांच्या खेळातील कौशल्याला नवा आयाम देण्यासाठी होत असलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट लिग  स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून श्री. सौरभ दंदणे व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समिती चे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.



Monday, May 22, 2023

मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला


मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व 
स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला

मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व 
स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला,


मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केले विशेष कौतुक 

सातारा, दि.22 - प्रा अजय शेटे
 मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख व मा.मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेशजी चिवटे साहेब यांना  महाराष्ट्र दिना निमित्त जनहित फाऊंडेशन यांच्या वतीने  'महाराष्ट्र अभिमान ' पुरस्कार 2023 या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले .त्या पुरस्काराचे मिळालेले 25 हजार रुपये अधिक आपल्या स्वतःच्या जवळील 25 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये असे त्यांनी आपण मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला देणार असल्याचे त्याच वेळी  जाहीर केले होते.त्यानुसार  त्यांनी ही रक्कम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी जलसंपदा मंत्री मा.गिरीश जी महाजन हजर होते.
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने राज्यातील एकही सर्वसामान्य रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही.याची आपण पूर्णपणे काळजी घेत असून,रुग्णांना  दिलासा देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे.असे यावेळी त्यांनी  सांगितले .
मा.मंगेशजी चिवटे यांच्या या अनोख्या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष  कौतुक होत आहे.वीरशैव लिंगायत समाज संघटना,लिंगायत टिव्ही लाईव्ह  न्यूज चॅनेल तर्फे ही त्यांचे विशेष अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Monday, May 8, 2023

महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी ,जयश्रीताई पहेलवान शिवैक्य.

 महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी ,जयश्रीताई पहेलवान शिवैक्य.




महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी ,जयश्रीताई पहेलवान शिवैक्य.




सातारा , दि.8 प्रतिनिधी

 महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी व ज्यांनी आपल्या उभ्या हयातीत म.बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित एक अंकी नाटक सादर केले अशा शरणी जयश्रीताई पहेलवान ,सांगली या आज  लिंगैक्य झाल्या.वीरशैव सभेची सतत सेवा करण्यात त्यांनी आपले उभे जीवन अर्पण केले.त्या वीरशैव महासभेचे अध्यक्ष शिवराज शेटकार यांच्या भगिनी होत.

त्यांना अखिल भारतीय वीरशैव महासभा,बेंगलोर .जिल्हा अध्यक्ष, लातूर व सर्व पदाधिकारी ,सदस्य,लिंगायत टिव्ही लाईव्ह  न्यूज चॅनेल यांचे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Sunday, May 7, 2023

लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .

 लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .


      

लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .


                                             

सातारादि.6 - रविंद्र वाकडे.

म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ सातारा यथील औन्द्कर मठात  संपन्न झाला .



कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली या वेळी उपस्थित  समाज बंधू आणि भगिनी.



सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक 2023 मध्ये विजयी झालेल्या लिंगायत समाजातील सर्व विजयी झालेले समाज बांधव सत्कार केला या मध्ये जावळी - महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक   मा.प्रकाशशेठ जेधे भाऊ,कोरेगाव चे मा.सुनिलशेठ निदानमा.ॲड.अमोल राशिनकर




खटाव - वडूज चे मा.संकेतशेठ म्हामणेपाटण चे मा.बाळासाहेब महाजननिरा - पुरंदर चे मा.पंकजशेठ निलाखे ईत्यादि मान्यवर यांचा  सत्कार समाजाचे वतीने मान्यवर हस्ते करण्यात प. पू.औंधकर महाराज मठ ,बुधवार पेठ,सातारा येथे  हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी  सौ सुषमाताई महाजन माजी नगराध्यक्ष पाटण ,आणि सौ प्रियांका ताई राशिनकर सरपंच बोधेवाडी यांचा सत्कार हि या वेळी करण्यात आला .सातारा जिल्हा हा खुप मोठा आहे आणि येथे शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्या मधून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण  घेण्यासाठी येऊ ईच्छत  आहेत मात्र काही अडचणी मुळे जमत नाही तेव्हा त्यांच्या  साठी एक वसतिगृह  या ठिकाणी झाले तर अनेक गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय कमी दरात  करता येईल या साठी मी मदत करण्यासाठी तयार आहे  समाजातील इतर बांधवानी ही या साठी  सहकार्य करावे,असे मनोगत जावली येथील जेष्ट सामाजिक कार्यकर्ते मा. विलासराव जेधे माजी सरपंच सायगाव जावली

                                     



 समाजाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार हा इतर सर्व सत्कारा पेक्षा हि खूप मोठा आहे ,सत्कार मूर्ती विजयी उमेदवार यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर दादा कस्तुरे यांनी केलं सूत्र संचालन महादेव मेंडगिरी यांनी  केलं तर आभार प्रदर्शन अक्षय विघ्ने यांनी केलं या कार्यक्रमा साठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...