Wednesday, June 28, 2023

वडिलोपार्जित व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी आज आहेत 5 हजार वाहनांचे मालक.



वडिलोपार्जित व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी आज आहेत 5 हजार वाहनांचे मालक

वडिलोपार्जित व्यवसाय सोडून सुरू केली स्वतःची कंपनी आज आहेत 5 हजार वाहनांचे मालक .
सातारा, दि.28  : रविंद्र वाकडे
भारतात ध्येय व कठोर परिश्रम करून बिझनेसमध्ये यशस्वी झालेले अनेक जण आहेत. शून्यातून सुरुवात करणारे असेच एक उद्योगपती म्हणजे व्हीआरएल लॉजिस्टिक्सचे मालक विजय संकेश्वर.
वडिलोपार्जित व्यवसाय सोडून स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभारण्याची त्यांची कहाणी खूप रंजक व प्रेरणादायी आहे.

 देशातील 'ट्रकिंग किंग' म्हणून ओळखले जाणारे विजय संकेश्वर यांचा प्रवास जाणून घेऊयात. या संदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलंय. 1976 मध्ये सुरू केलेला व्यवसाय देशातील आघाडीच्या लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या यादीत सर्वात वर व्हीआरएल लॉजिस्टिक्सचं नाव येतं.
आज कोट्यवधींची उलाढाल असलेली ही कंपनी इतक्या सहज उभारली गेली नव्हती. या मागे अनेक वर्षांची मेहनत आहे. व्हीआरएल लॉजिस्टिक्सचे संस्थापक विजय संकेश्वर यांच्याजवळ आज जवळपास 5,000 कमर्शियल वाहनं आहेत. इतक्या वाहनांमुळे कंपनीचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं.

या कंपनीची स्थापना विजय संकेश्वर यांनी एक ट्रक घेऊन 1976 मध्ये केली होती.
कौटुंबिक व्यवसायात मन रमलं नाही .विजय यांनी कौटुंबिक व्यवसाय सोडून नवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना घरातून विरोध झाला. त्यांच्या कुटुंबाचा प्रिंटिंग प्रेस बिझनेस होता.

विरोध पत्करून त्यांनी नवा बिझनेस उभारला आणि आज त्यांच्या कुटुंबालाही त्यांचा अभिमान आहे. उधार पैसे घेऊन सुरू केला व्यवसाय कौटुंबिक व्यवसाय सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी कुटुंबियांकडून आर्थिक मदत घेतली नाही, तर ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उधार घेऊन एक ट्रक घेतला व काम सुरू केलं. व्यवसायात आल्यावर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, आर्थिक समस्याही आल्या, पण त्यावर त्यांनी मात केली आणि 90 च्या दशकात त्यांना यश मिळू लागलं. एका ट्रकने सुरू केलेला व्यवसाय 150 ट्रकवर येऊन पोहोचला होता.
ट्रकिंग किंगच्या जिवनावर बनला चित्रपट सुरुवातीच्या टप्प्यात या व्यवसायात टेक्नॉलॉजी आणि दळणवळणाचा अभाव हे सर्वात मोठे अडथळे होते. यासोबतच लॉजिस्टिक्सचा व्यवसायही संघटित नव्हता.
पण, 1990 नंतर त्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढू लागला. मग त्यांनी विजयानंद ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सुरू केली. पुढे त्याचं नाव बदलून VRL Logistics ठेवलं. आता ही कंपनी जेट सर्व्हिसेसही पुरवते.
विजय यांच्या प्रवासावर कन्नड भाषेत 'विजयानंद' नावाचा चित्रपट 2022 प्रदर्शित झाला होता. कंपनीच्या शेअरने 5 वर्षांत दिले 115% रिटर्न एका रिपोर्टनुसार, संकेश्वर यांची एकूण संपत्ती 70 कोटी रुपये आहे. व्हीआरएल लॉजिस्टिकचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहेत आणि शेअर बाजारातील व्यवहारांदरम्यान सोमवारी 716.00 रुपयांच्या किमतीवर बंद झाले. गेल्या पाच वर्षांतील या कंपनीच्या शेअर्सची कामगिरी पाहिली तर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 115.05% रिटर्न दिले आहेत. या लॉजिस्टिक कंपनीची मार्केट कॅप आज 6200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...