लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती.
लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्रच्या बीड जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आत्मलिंग शेटे यांची नियुक्ती.
सातारा, दि.22 - लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष श्री सुनीलशेठ रुकारी यांच्या आदेशाने बीड जिल्हा लिंगायत संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक नेते,जेष्ठ पत्रकार श्री. आत्मलिंगजी शेटे यांची निवड करण्यात आली. त्यांना लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष श्री राजाभाऊ मुंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी युवा नेते सागर मुंडे, प्रथितयश व्यापारी निलेश होनराव, वैजनाथ गुळवे यांची विशेष उपस्थिती होती.
समाजाच्या प्रत्येक कामात हिरीरीने सहभागी असणारे धडाडीचे नेते श्री .आत्मलिंगजी शेटे यांना लिंगायत संघर्ष समितीचे युवा नेते मा.प्रदिपजी साखरे यांनीही विशेष शुभेच्छा देवून त्यांचे खास अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment