लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .
लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .

सातारा, दि.6 - रविंद्र वाकडे.
म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ सातारा यथील औन्द्कर मठात संपन्न झाला .
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली या वेळी उपस्थित समाज बंधू आणि भगिनी.
सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक 2023 मध्ये विजयी झालेल्या लिंगायत समाजातील सर्व विजयी झालेले समाज बांधव सत्कार केला या मध्ये जावळी - महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मा.प्रकाशशेठ जेधे भाऊ,कोरेगाव चे मा.सुनिलशेठ निदान, मा.ॲड.अमोल राशिनकर,
खटाव - वडूज चे मा.संकेतशेठ म्हामणे, पाटण चे मा.बाळासाहेब महाजन, निरा - पुरंदर चे मा.पंकजशेठ निलाखे ईत्यादि मान्यवर यांचा सत्कार समाजाचे वतीने मान्यवर हस्ते करण्यात प. पू.औंधकर महाराज मठ ,बुधवार पेठ,सातारा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सौ सुषमाताई महाजन माजी नगराध्यक्ष पाटण ,आणि सौ प्रियांका ताई राशिनकर सरपंच बोधेवाडी यांचा सत्कार हि या वेळी करण्यात आला .सातारा जिल्हा हा खुप मोठा आहे आणि येथे शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्या मधून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येऊ ईच्छत आहेत मात्र काही अडचणी मुळे जमत नाही तेव्हा त्यांच्या साठी एक वसतिगृह या ठिकाणी झाले तर अनेक गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय कमी दरात करता येईल या साठी मी मदत करण्यासाठी तयार आहे समाजातील इतर बांधवानी ही या साठी सहकार्य करावे,असे मनोगत जावली येथील जेष्ट सामाजिक कार्यकर्ते मा. विलासराव जेधे माजी सरपंच सायगाव जावली
समाजाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार हा इतर सर्व सत्कारा पेक्षा हि खूप मोठा आहे ,सत्कार मूर्ती विजयी उमेदवार यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर दादा कस्तुरे यांनी केलं सूत्र संचालन महादेव मेंडगिरी यांनी केलं तर आभार प्रदर्शन अक्षय विघ्ने यांनी केलं या कार्यक्रमा साठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.





No comments:
Post a Comment