वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
कोपरगाव , दि.26 -प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत समाजातील आंतरराष्ट्रीय संस्था असलेल्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन(व्हाया)च्या वतीने लिंगायत लोकनेते व्हाया चे अध्यक्ष मा.काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाया लिंगायत प्रिमियर लिग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोपरगाव येथे समता इंटरनॅशनल स्कूल च्या महात्मा बसवेश्वर क्रीडांगणावर केले असल्याची माहिती ' व्हाया युथवींग ' चे अध्यक्ष मा.प्रदिप साखरे यांनी दिली.
याबाबत पुढे अधिक माहिती देताना लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष श्री.भगवान कोठावळे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूलच्या महात्मा बसवेश्वर क्री डांगणावर २७ व २८ मे २०२३ रोजी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण १२ संघ सहभागी होणार असून ,पुणे येथील विश्वेश्वर सहकारी बँक यांच्या कडून विजेत्या संघाला १ लाख रुपयांचे रोख बक्षीस व विश्वेश्वर चषक प्रदान करण्यात येणार आहे.तर उप विजेत्या संघाला लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष श्री.राजाभाऊ मुंडे यांच्या कडून ५१ हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.
तसेच या स्पर्धेतील 'मॅन ऑफ द मॅच' , ' मॅन ऑफ द सिरीज ' , उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट बॅट्समन या सारखी विविध बक्षिसे राहुरी येथील आदर्श पतसंस्थेचे चेअरमन श्री.शिवाजी आप्पा कपाळे, माजलगाव येथील मंगलनाथ पतसंस्थेचे चेअरमन श्री.रविंद्र कानडे, नाशिक येथील श्री.गणेश भोरे आदींनी जाहीर केली असल्याचे लिंगायत संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.चंद्रशेखर दंदणे यांनी सांगितले.
समाजातील तरुणांच्या खेळातील कौशल्याला नवा आयाम देण्यासाठी होत असलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट लिग स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून श्री. सौरभ दंदणे व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समिती चे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

No comments:
Post a Comment