महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण.
सातारा, दि.16 -
रविंद्र वाकडे
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,सातारा यांच्या वतीने वितरित केला जाणारा सन 2024 सालचा अतिशय प्रतिष्ठेचा 'बसव भूषण पुरस्कार ' रविवार,दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी संध्या.4 वा. प. पू.औंधकर मठ ,सातारा येथे समाजभूषण मा.भारत शेठ बारवडे , काव्य व साहित्य भूषण मा.महालिंग मेन कुदळे,सहकार भूषण मा.दिलीप पिलके, उद्योग भूषण मा.राजेंद्र आटकेकर व कृषी भूषण मा.राजेंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, विरशैव इंटरनॅशनल चे असोसिएशन चे अध्यक्ष तथा सहकार महर्षी मा.ओम प्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे,लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट चे संचालक मा.प्रकाश शेठ गवळी सावकार, पेट्रोलियम उद्योजक मां.राजेंद्रशेठ घुटे,राष्ट्रीय लिंगायत संघ अध्यक्ष मा. प्रदिपबापू वाले या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन निमंत्रक संस्थापक अध्यक्ष सागर कस्तुरे,उपाध्यक्ष श्रीनिवास कामळे,सचिव महादेव मेंडीगिरि,कोषाध्यक्ष ॲड. सिद्धराज शेटे ,संचालक सदस्य नंदकुमार गुरसाळे, किरण लखापती,सुभाष ताटे, सौ. निर्मलादेवी बारवडे ,वीरशैव लिंगायत समाज,सातारा महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती नंदाताई चिंचकर,बसव विचार निमंत्रक अक्षय विघ्ने यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment