तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP शिवम विसापूरे .
तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP शिवम विसापूरे .
कराड दि २७ :- दिलीप महाजन
कराड येथे शिवसेवा चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने चरेगाव (ता.कराड) येथील शिवम विसापूरे यांनी राज्यसेवा परीक्षेच्या निकालात डीवायएसपी म्हणून यश मिळल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.कराडचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे अध्यक्षस्थानी होते. माजी नगरसेवक विनायक विभूते, अनिल खुंटाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे, उदय हिंगमिरे, नंदकुमार नवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विसापूरे म्हणाले, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. पण हे शिक्षण सुरू असतानाच मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. या परीक्षा मी देत गेलो. गतवर्षी माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली असून त्याचे ट्रेनिंग सध्या सुरू आहे. तर यावर्षी डी वाय एस पी म्हणून माझी निवड झाली आहे. असे यश चिकाटीने अभ्यास केल्यास इतर विद्यार्थीही मिळवू शकतात .आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करायला नक्कीच तयार आहे.
अरुण घाटे म्हणाले, खरंतर सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांची सेवा करण्यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. शिवम विसापुरे यांना तो मिळाला असून ते चांगली सेवा करतील असा आम्हाला विश्वास आहे.
प्रमोद सुकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात चरेगाव सारख्या ग्रामीण भागातील शिवम विसापूरे यांनी वयाच्या २५/२६ व्या वर्षी मिळवलेले यश हे इतरांना प्रेरणादायी आहे असे सांगितले. विनायक विभुते यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप चिंचकर, सुनील महाजन, संजय शेटे, शिवानंद डुबल ,आनंद शेटे,राजेंद्र घाटे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास रामचंद्र लाकोळे, बाजीराव शेट्टी, राजू खलीपे, गणेश हिंगमिरे, बाजीराव शेटेनावर, दीपक जोते, प्रा. हेमंत शेटे, चंद्रशेखर नकाते, प्रमोद तोडकर, रेश्मा कोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
कराड येथे स्पर्धा परीक्षेतून डीवायएसपी झालेल्या शिवम विसापूरे यांचा सत्कार करताना नंदकुमार बटाणे, विनायक विभूते, राजू शेटे,प्रमोद सुकरे आदी.

No comments:
Post a Comment