वीरशैव इंटरनॅशनल (व्हाया) लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न .
उद्घाटन ते बक्षिस वितरण सोहळ्याची सर्व नेत्रदिपक क्षणचित्रे .
वीरशैव इंटरनॅशनल (व्हाया) लिंगायत प्रिमीयर लीग महाराष्ट्र 2023 मोठ्या उत्साहात संपन्न .
उद्घाटन ते बक्षिस वितरण सोहळ्याची सर्व नेत्रदिपक क्षणचित्रे .
सातारा, दि.3 -
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया) व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र आयोजित व व्हाया चे अध्यक्ष लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे, लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय व्हाया लिंगायत प्रिमीयर लीग या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे 20 जिल्ह्याच्या 12 टिमने आपला सहभाग नोंदविला,
या लिगच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते मा .खा .चंद्रकांतजी खैरे साहेब,मा. आ. राहूलजी बोंन्द्रे , राजाभाऊ आबा मुंडे, शिवाजी अप्पा कपाळे, रवींद्रजी कानडे, ओंकार खुरपे, गणेशजी भोरे, तसेच नगर, नासिक, संभाजीनगर, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, मुंबई, लातूर, कोकण, सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते .
ऐतिहासिक व अतिशय उत्साहवर्धक झालेल्या या स्पर्धेत सर्वच स्पर्धकांनी उत्कृष्ट सांघिक खेळ केला .त्याबद्दल सर्वांचेच हार्दिक अभिनंदन होत आहे.या सामन्या मध्ये कोकण संघाने विजेतेपद ,एक लाख रुपये बक्षीस व विश्वेश्वर चषक जिंकला तर सोलापूर संघाने उपविजेेते पद पटकावून 50 हजार रुपये चे बक्षिस मिळविले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्हाया लिंगायत प्रिमीयर लिग महाराष्ट्र चे अध्यक्ष, व्हाया युथवींग अध्यक्ष मा.प्रदिपजी साखरे, लिंगायत संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. चंद्रशेखर दंदणे,
भगवान कोठावळे, सौरभ दंदणे, क्रीडा संघटक नितीनजी हिंगमिरे, समता इंटरनॅशनल स्कूलचा सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
लिंगायत समाजाच्या क्रिकेटच्या इतिहासात एक नव्या पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.असेच यावेळी सर्व मान्यवर व खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले.

No comments:
Post a Comment