मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व
स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला
मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व
स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला,
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केले विशेष कौतुक
सातारा, दि.22 - प्रा अजय शेटे
मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख व मा.मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेशजी चिवटे साहेब यांना महाराष्ट्र दिना निमित्त जनहित फाऊंडेशन यांच्या वतीने 'महाराष्ट्र अभिमान ' पुरस्कार 2023 या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले .त्या पुरस्काराचे मिळालेले 25 हजार रुपये अधिक आपल्या स्वतःच्या जवळील 25 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये असे त्यांनी आपण मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला देणार असल्याचे त्याच वेळी जाहीर केले होते.त्यानुसार त्यांनी ही रक्कम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी जलसंपदा मंत्री मा.गिरीश जी महाजन हजर होते.
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने राज्यातील एकही सर्वसामान्य रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही.याची आपण पूर्णपणे काळजी घेत असून,रुग्णांना दिलासा देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे.असे यावेळी त्यांनी सांगितले .
मा.मंगेशजी चिवटे यांच्या या अनोख्या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.वीरशैव लिंगायत समाज संघटना,लिंगायत टिव्ही लाईव्ह न्यूज चॅनेल तर्फे ही त्यांचे विशेष अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment