डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडेजिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .
डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडे,जिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .

कराड , दिं.6 - दिलीप महाजन कराड प्रतिनिधी
डिजिटल मिडियाऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्रच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी प्रा. अजय शेटे, जिल्हा उपाध्यक्ष पदी दिलीप महाजन आणी कुलदिप मोहिते यांची निवड करण्यात आली ,
मधूबन ऍग्री टुरिझम ,नाडे नवारस्ता येथे काल आयोजित करण्यात आलेल्या मिटिंग मध्ये या निवडी करण्यात आल्या , या वेळी सांगली जिल्ह्या अध्यक्ष पदी ॲडव्हान्स न्यूज चे संपादक, ॲड. अंश खलीपे आणि महिला अध्यक्ष पदी ॲड शीतल बेद्रे सांगली यांची निवड करण्यात आली . कडेगाव तालुका अध्यक्ष पदी कुलजीत महाजन यांची निवड झाली, तर डिजिटल मि डिया ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र च्या अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची निवड केली, आहे तसेच कराड तालुका पदी दैनिक सांजवात चे प्रल्हाद गुजले यांची निवड पाटण तालुका पदी आपला सातारा न्यूज चे विक्रम पवार यांची निवड खटाव तालूका पदी सचिन पवार यांची निवड करण्यात आली आहे,
या वेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष प्रा. अजय शेटे म्हणाले सद्या सर्वत्र डिजिटल मिडिया चे काम मोठ्या प्रमाणात चालत आहे .मात्र त्यांच्या समस्या आणि अडचणी साठी कोणी ही पुढाकार घेत नाही , तेव्हा आम्ही या संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया मध्ये काम करत असणाऱ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या हक्कासाठी लढणार आहोत. महाराष्ट्रात सर्वत्र या संघटनेच्या माध्यमातून काम चालू करण्यात येणार असून ,लवकरच प्रत्येक जिल्ह्यात उर्वरित पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी आम्हाला संपर्क करावा असे आवाहन या वेळी करण्यात आले


No comments:
Post a Comment