लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना राष्ट्रपिता महात्मा फुले पुरस्कार प्रदान .
लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना राष्ट्रपिता महात्मा फुले पुरस्कार प्रदान .
कराड , दि.17 -रविंद्र वाकडे .
ओगलेवाडी , ता.कराड येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा फुले पुरस्काराने गौरविण्यात आले . मा.यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) कराड येथे विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना सहकुटुंब सहपरिवार गौरविण्यात आले .
यावेळी कराड चे तहसीलदार मा.विजय पवार ,नायब तहसीलदार मा.विजय माने,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. आप्पासाहेब गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी पत्रकारिता प्रसार माध्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने श्री. दिलीप महाजन यांना गौरविण्यात आले.
दिलीप महाजन हे गेले 25 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध दैनिकांत काम केले आहे. सध्या ते दैनिक ऐक्यचे ओगलेवाडी वार्ताहार म्हणून काम पाहत आहेत. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना परिवर्तन प्रतिष्ठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराने गौरविण्यात आले .यावेळी मा. विजय पवार , प्राचार्य कादर नायकवडी , प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण मा. आप्पासाहेब गायकवाड यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.तसेच यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 15 जानेवारी रोजी करण्यात आले.
संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार श्री. बबनराव तडवी ,डॉ.मनोज पाटील, अरुण भिसे ,मा.नायब तहसीलदार बी.एम .गायकवाड ,बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण लादे,सचिव बुद्धभुषण गायकवाड, सल्लागार श्री .राजेंद्र माने, प्राचार्या सौ. विद्या मोरे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.




No comments:
Post a Comment