मा.भगवान कोठावळे यांची राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड .
मा.भगवान कोठावळे यांची राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड .
सातारा ,दि.1 -रविंद्र वाकडे.
अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.भगवान कोठावळे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या राज्यस्तरीय संस्थेत संचालक म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील 16000 पेक्षा जास्त व हजारो कोटींच्या उलाढाल असणाऱ्या संस्थांमधून या संस्थेला हा बहुमान मिळाला आहे.
हा सर्व अर्थसिद्धी पतसंस्थेच्या पारदर्शक कार्याचा बहुमान आहे,असे मला वाटते अशी प्रतिक्रिया मा.संचालक भगवान कोठावळे यांनी दिली आहे.
अर्थसिद्धी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री.श्रीकांत तोडकर पतसंस्थेच्या सर्व संचालक,कर्मचारी,दैनंदिन ठेव प्रतिनिधी,सभासद व खातेदारांच्या तसेच , लिंगायत संघर्ष समिती , लिंगायत समाज संघटना,लिंगायत TV live यांच्या वतीने मा.भगवान कोठावळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .


No comments:
Post a Comment