‘समग्र महात्मा बसवेश्वर’ ग्रंथाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न .
‘समग्र महात्मा बसवेश्वर’ ग्रंथाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न .
लातूर दि 14 :- प्रतिनिधी
‘समग्र महात्मा बसवेश्वर’ ग्रंथाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न . बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्य व वचनांवर आधारित माहितीचा संग्रह असलेला महाग्रंथ आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या समग्र महात्मा बसवेश्वर ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भगवंतराव पाटील चांभरगेकर महाराज हे होते.
हा प्रकाशन सोहळा लातूर शहरातील असंख्य साहित्यीकांसाठी खुप मोठी बौध्दीक मेजवानीच ठरला. सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 4.00 वा.संपला. 4 ते 5 तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मंत्रमुग्ध होवून महात्मा बसवेश्वरांचे विचार ऐकत होते. प्रा.सुदर्शनराव बिरादार लिखीत या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी भगवंतराव पाटील चांभरगेकर, प्रा.डॉ.मधुकर सलगरे, अॅड.अण्णाराव पाटील, प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, प्रा.रामदास मिरजगावे, डॉ.मन्मथ भातांब्रे, अॅड.मधुकर राजमाने, प्रा.एम.बी.पठाण, संभाजीराव सुळ, प्राचार्य चंद्रशेखर भोगडे, निवृत्त पोलीस उपायुक्त नागनाथ कोडे, शिवाजीराव साखरे वाघ आदिंची उपस्थिती होती. त्यांची यावेळी समायोचित भाषणे झाली.
महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर संपूर्ण माहिती असलेला हा ग्रंथ खुप मोलाचा असल्याचे सर्व मान्यवरांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ग्रंथाचे लेखक प्रा.सुदर्शनराव बिरादार यांचे सर्वमान्यवरांनी खुप कौतुक केले. यावेळी विविध संघटनांच्यावतीने लेखकांचा सत्कार करण्यात आला. मी केवळ महात्मा बसवेश्वरांचे विचार, प्रचार व प्रसार करण्यासाठी व त्यांच्या प्रेमापोटी या ग्रंथाची निर्मिती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील असंख्य महिलांची उपस्थिती होती. या ग्रंथाचे मोफत वाटप याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहरातील साहित्यीक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, लिंगेश्वर बिरादार, वैजनाथ जट्टे, जी.जी.ब्रम्हवाले, विश्वनाथ मिटकरी, सिद्रामप्पा पोपडे, शिवराज शेटकार, शिवदास लोहारे, विजयकुमार कुडूंबले, चंद्रकांत शिरसे, चंद्रकांत तोळमारे, सुभाष शेरे, माणिकअप्पा मरळे आदिंनी प्रयत्न केले. यावेळी लिंगायत समाजातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा व लिंगायत समाजाचे निवडून आलेल्या नुतन सरपंचाचा सत्कार यावेळी करण्यात आला.
शिवकांत स्वामी यांनी कार्यक्रमाचे जोरदार सुत्रसंचलन केले तर सौ.शंकरेताई, कमलाकर डोके यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचे वाचन केले तर प्रास्ताविक ग्रंथाचे लेखक प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी केले. तर आभार कमलाकर डोके यांनी मानले.

No comments:
Post a Comment