लिंगायत समाजातील जेष्ठ दिलीप महाजन यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर,उद्या पुरस्कार वितरण .
लिंगायत समाजातील जेष्ठ दिलीप महाजन यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर, उद्या पुरस्कार वितरण .
सातारा , दि. 9 : रविंद्र वाकडे प्रतिनिधी .
येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी पत्रकारिता प्रसार माध्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय राष्ट्रपिता जोतिबा फुले आदर्श पत्रकार पुरस्काराने ओगलेवाडी, ता. कराड येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली.दिलीप महाजन हे गेले 25 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.
त्यांनी विविध दैनिकांत काम केले आहे. सध्या ते दैनिक ऐक्यचे ओगलेवाडी वार्ताहार म्हणून काम पाहत आहेत. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना परिवर्तन प्रतिष्ठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रपिता जोतिबा फुले आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात येणार आहे.`या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 15 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाणस्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाजन यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


No comments:
Post a Comment