महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या पुढाकाराने दिनांक 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न .
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या पुढाकाराने दिनांक 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न .
सातारा दि २० :- प्रा.अजय शेटे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या पुढाकाराने दिनांक 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी माजी मंत्री आमदार विजय देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक ॲड.अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक ॲड. माधवराव पाटील टाकळीकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बी. एस. पाटील, विजयकुमार हत्तुरे, सुधीर सिंहासने, प्रा. राजेश विभूते, महेश पाटील, प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगे, दया किडे, योगेश कापसे आदीसह शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी 29 जानेवारीच्या मोर्चाचे राज्य सरकार स्वागत करेल, त्याचबरोबर वरील सर्व मागण्या संदर्भात विचार करून प्रामुख्याने सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. यावेळी या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः, तसेच विनरावजी कोरे, विजय देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत निवेदन स्वीकारून समाजबांधवांना या कार्यपुर्तीचे ग्वाही देणार असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment