युवा ग्रामोद्योजक विकास कार्यक्रमाचे आयोजन
सातारा, दि.27- प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
भारतीय युवा शक्ती ट्रस्ट व एच डी एफ सी बँक परिवर्तन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा ग्रामोद्योजक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नवीन धोरणा प्रमाणे आज नोकरी मागणाऱ्या व्यक्ती उद्या नोकरी देणाऱ्या बनणार आहेत.तसेच अनेक युवकांचे स्वतः उद्योजक बनण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे
या योजनेसाठी असलेली पात्रता पुढीलप्रमाणे आहे.हे उद्योजक युवक वय वर्षे 18 ते 35 या वयोगटातील असावेत.त्यांनी उत्पादन,व्यापार व सेवा क्षेत्रातील व्यवसाय करणारे असावेत.तसेच ते सातारा जिल्ह्यातील रहिवासी असावेत .
या उद्योजकांना ट्रस्ट व बँकेतर्फे समुपदेशन करण्यात येवून त्यांच्यासाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.तसेच मेंटर तत्वानुसार विश्वासू सल्लागारां
मार्फत पहिली दोन वर्षे सतत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच राष्ट्रीयीकृत बँके मार्फत रू.एक लाख ते रू.पन्नास लाखांपर्यंत विनातारण व विना जामीन कर्ज मिळवून देण्यात येणार आहे. सदर उद्योजकाला विविध प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देण्यात येणार आहे.तसेच मेळावे व विविध पुरस्कार यासाठी त्यांची शिफारस करण्यात येणार आहे
याबाबत अधिक माहितीसाठी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ,रत्न कल्याण ,पहिला मजला,युनियन बँक ऑफ इंडिया च्या वर ,रेल्वे स्टेशन रोड,
कराड, पिन क्र.415110 व जी- 34 राजधानी टॉवर,सातारा,पिन क्र.415001, मोबा. क्र.8010566272 व 9822683794,मेल - byst.satara@cil.in website-www.bystonline.org यावर संपर्क साधावा.या संस्थेच्या सर्व सेवा ह्या मोफत असून,हेल्प लाईन क्र.१८००- १२१ -१८१- १८१ असा आहे.तरी इच्छुक नव उद्योजकांनी त्वरित संपर्क साधावा. असे आवाहन ट्रस्ट व बँक यांचेमार्फत केले गेले आहे.
No comments:
Post a Comment