लिंगायत टिव्ही ची स्थापना का आणि , !कशासाठी ?
लिंगायत टिव्ही ची स्थापना का आणि , !कशासाठी ?
सातारा दि :- मनोगत प्रा.अजय शेटे.लिंगायत TV live
पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख
वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना या व इतर आपल्या धर्म व समाजात कार्यरत असणाऱ्या सर्व संघटना यांचे कार्य इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात नाही.कदाचित कधीतरी एखादी बातमी देवून इतर आपले कार्यक्रम यांची साधी दखल ही इतर प्रसार माध्यमातील प्रचलित यंत्रणा घेत नाही.हे वारंवार आपल्याला जाणवून येत होते.किंबहुना चांगल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी न देता आपल्याला जास्तीत जास्त अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता.
आपण इतर सामाजिक घडामोडींचे नीट निरिक्षण केले तर समजून येईल की,इतर धर्म व समाज जाती यांचे कार्यक्रम अतिशय शुल्लक दर्जाचे असतात.परंतु अशा कार्यक्रमाची फक्त मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जाते व नुसता सुशोभित भपका करून त्या प्रवाहात आपल्याला खेचण्याचा प्रयत्न केला जातो.
विशिष्ट देव, महाराज,मठ संस्थाने,श्लोक,स्तोत्रे,सद्गुरू त्यांची व्याख्याने,भजने,कीर्तने,पूजा साहित्य,पुस्तके अशाप्रकारच्या गोष्टींचे नुसते हेतुपूर्वक ठरवून ब्रॅण्डिंग व मार्केटिंग चालू आहे.आणि त्यामध्ये आपल्याला सेवा भावाच्या नावावर गुंतवून टाकले जात आहे.म्हणजे प्रत्येक गोष्ट आपला सेवाभाव असला तरी पुढील लोकांचा तो सरळसरळ शुद्ध व्यवसाय,धंदा आहे.
या वरून आपणास हे समजून येते की,सध्या प्रचलित ज्या अनेक संघटना आहेत.त्यात त्यांचा सरळसरळ काही तरी स्वार्थ आहे.पण आपला मात्र तो परमार्थ व सेवाभाव आहे.
तेव्हा आपला धर्म,जात, संस्कृती,आपले देव, सद्गुरू,महाराज,आपले साहित्य,मंत्र,श्लोक,भजन कीर्तन,आपली भाषा,आपले समाजसेवक,नेते मंडळी यांच्या बद्दल आपले विचार सकारात्मक,स्वार्थी का करू नयेत ? असा विचार एकदा तरी आपल्या सर्व समाज बांधवांनी करावा.हा विचार रुजावा.म्हणून लिंगायत टिव्ही ची रचना ही अनेक कार्यकर्त्यांनी पदरचे पैसे घालून रितसर कायदेशीर रित्या नोंद करून केली आहे.यामागे आपल्या सेवाभावी दानशूर लोकांचे खूप मोठे योगदान आहे.
तेव्हा आपल्या समाजातील सर्व कलाकार मंडळी,विचारवंत,समाज कार्यकर्ते,नेते मंडळी यांचे कार्य आपल्या समाजाबरोबर आपल्या वैयक्तिक स्थानिक संबंधावर इतर समाजातील लोकांना कळावे .या हेतूने लिंगायत टिव्ही ची रचना केली आहे.
आपणही आपले वाढदिवस,आपले सामाजिक कार्य,कौतुक सोहळा, उद्योग धंदा व्यवसाय जाहिराती ,आपल्या अंगातील इतर कला व विद्या यांचे जर सादरीकरण करायचे असेल तर आपले लिंगायत टिव्ही हे हक्काचे व्यासपीठ आपण मोठ्या मेहनतीने तयार करून उभे केले आहे.तेव्हा बाहेर इतर प्रसार माध्यमात अवास्तव जादा पैसे खर्च करून आपल्या कौशल्याची प्रसिद्धी करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या लिंगायत टिव्ही मध्ये योग्य खर्चात आपली योग्य ती सर्व प्रकारे प्रसिद्धी केली जाईल.तरी सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या लिंगायत टिव्ही ला सहकार्य करून सर्व समाजाच्या सेवेची व उन्नतीची संधी द्यावी.
.आज जर आपण घरात पहात असलेल्या सर्व टिव्ही वाहिन्या पाहिल्या तर अनेक जाती धर्माच्या टिव्ही वाहिन्या सुरू आहेत.तसेच काहींनी आपल्या सेवाभाव वृत्तीवर पैसे कमावून प्रसिद्ध अशा टिव्ही वाहिन्या विकत घेतल्या आहेत.असे सर्व ठिकाणी दिसून येईल.नेते मंडळींची निवड असुद्यात,पदाधिकारी नेमणे असूद्या,खेळाडू निवड असूद्या अथवा कलाकार निवड असूद्यात.विशिष्ठ जाती धर्माचेच व जातीचेच अभिनेते व अभिनेत्री यांची निवड करून त्यांना छोटा पडदा व मोठ्या पडद्यावर संधी दिली जात आहे.यातील काही तर निव्वळ ठोकळे आहेत.त्यांना ग चा म पण येत नाही.पण त्यांना खूप काही येत आहे असे दाखवून त्यांचे खोटे कौतुक केले जात आहे. व त्यांना पद,पैसा,प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत..आणि आपले मात्र सोने असून सुद्धा माती च्या मोलाने दुर्लक्षित करून प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आहे.तेव्हा सर्वांनी सर्व बाबतीत अखंड सावधान राहून उघड्या डोळ्यांनी वाटचाल केली पाहिजे व आपला दैवी, धार्मिक, देशप्रेमी,राजकीय ,सामाजिक,भौतिक व आर्थिक प्रगती ही अशी सकारात्मक स्वार्थ ठेवून केली पाहिजे. कळावे.हिच सर्वांना कळकळीची नम्र विनंती .






No comments:
Post a Comment