खानापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
खानापूर दि 24 :- शिवकुमार कल्याणी प्रतिनिधी लिंगायत TV live
महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपा च्या माध्यमातून जगाला लोकशाहीची देणगी दिली आहे.स्त्री पुरुष समानता व सामाजिक समतेचा संदेशा सोबत महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन खानापूर चे उपसरपंच श्री अनिल पाटील, यांनी केले. खानापूर येथे, महात्मा बसवेश्वर जयंती समीतीने आयोजित केलेल्या बस्वव्याख्यान सोहळा व बसव व्याख्यानमालेत ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.
यावेळी बसव पिठावर गावातील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सर्व सेवा सहकारी सोसायटी सदस्य, जेष्ठ नागरिक ,तथा विविध समाजातील लोकप्रतिनिधींचे सत्कार शाल व श्रीफळ देऊन बसव समीतीच्या वतीने करण्यात आले,
यावेळी व्यासपीठावर व्याख्याना पुर्वी संगीत सुरमणी रवीराज किडींले व त्यांच्या संच्यातर्फ अतिशय सुश्राव्य असे मंत्रमुग्ध करणारे बस्वगायन झाले व उपस्थितांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला ,
त्यानंतर
, व्याख्यानमालेचे मुख्य वक्ते प्रा. डॉ.राजशेखर सोलापुरे यांच्या व्याख्यानाला सुरूवात झाली.
“बसव विचारांची वर्तमानातील उपयुक्तता” या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की माणसाला माणूस बनवण्यासाठी बसव विचार आवश्यक असून काम करणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचे काम
बसवेश्वरांनी केले आहे. महात्मा बसवेश्वर इतिहासाचे गायक नव्हे तर नायक होते. देशाचा प्रधानमंत्री कसा असावा याचा आदर्श आपल्या आचार व विचारातून बसवेश्वरांनी जगासमोर मांडला आहे. देशात देवालय नाहीतर ग्रंथालयाची गरज असून माणसाला सक्षम बनवण्यासाठी बसवेश्वरांच्या वचन साहित्याची आवश्यकता आहे. लिंगायत धर्मात कोणत्या प्रकारचे
सुतक नाही. महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत ओळख देऊन जाती संपले आहेत म्हणून आज जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी बसवण्णांच्या विचाराची गरज आहे. नैतिक राजकारणाचा आदर्श निर्माण करण्याचे काम बसवेश्वरांनी केले असून आजची संसद बसवेश्वराच्या विचाराने काम केल्यास भारत महासत्ता होईल असे परखड मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय आगलावे यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनंत पाटील खानापूरकर,माजी सरपंच भगवान विभुते ,मारोती परबते,राजेश्वर अटकळे , ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी गौतम मंगनाळे, गौतम वाघमारे, पंडीत वाघमारे, खानापूर मठातील गुरू श्री शिवराज महाराज मठवाले, बसवजयंती उत्सवाचे
मन्मथ परबते, उपाध्यक्ष राजु वळंके सचिव अरविंद धनसुरे,विनोद रायकोडे,विजय धनसुरे बसवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ,सदस्य,तथा गावातील बसवप्रेमी समाज बांधव उपस्थित होते..
No comments:
Post a Comment