वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर
यवतमाळ दि 29 प्रतिनिधी निलेश शेटे लिंगायत TV live
वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर
अध्यक्षपदी डॉ.जयेश हातगांवकर, उपाध्यक्षपदी डॉ.प्रा. किशोर मांडगावकर,तर सचिव पदी निलेश शेटे ह्यांची निवड
लिंगायत समाज यवतमाळच्या वीरशैव हितसंवर्धक मंडळ, यवतमाळची २०२२-२०२५ करिता नवनीवार्चीत कार्यकारिणीची सर्व सम्मंतीने निवड करण्यात आली.
वीरशैव हितसंवर्धक मंडाळाची २०२१-२२ची वार्षीक आमसभा डॉ.अशोक मेनकुदळे ह्यांचे अध्यक्षेते खाली महात्मा बसवेश्वर भवन येथे संप्पन झाली,प्रास्तावीक सचिव निलेश शेटे ह्यांनी केले तसेच २०२१-२२ चे संपुर्ण जमा खर्च वाचुन दाखवुन त्यास मान्यता सर्वानुमते देण्यात आली.ह्यानंतर नविन कार्यकारीणी ची निवड सर्वानुमते करण्यात आली ह्या मध्ये अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर, उपाध्यक्षपदी डॉ.प्रा. किशोर मांडगावकर, सचिव पदी निलेश शेटे,सहसचिव पदी गजानन हातगांवकर, कोषाध्यक्ष पदि गिरीष गाढवे,सदस्य म्हणुन विनोद देशमुख, नागेश कुल्ली, रमेश केळकर, राजु कुऱ्हेकार,जयंत डोंगरे,भुषण तंबाखे,ह्यांची निवड करण्यात आली आणि सल्लागार पदी अध्यक्ष म्हणून डॉ.अशोक मेनकुदळे, चंद्रशेखर उमरे रविंन्द्र दिवे,सुधाकर केळकर,सुरेश शेटे,महेश्वरराव गाढवे,प्रकाश चनेवार,अशोक तेले,विनोद नारिंगे,विजय देशमुख,
तांत्रिक प्रमुख प्रदिप उमरे,निर्मल ठोंबरे ह्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.ह्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांचे आभार मानले तसेच भविष्यात मंडळाला विशिष्ट उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला आणि नवनिर्वाचीत कार्यकारिणीत नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.त्यामुळे आता
लिंगायत समाजामध्ये नवनवीन कार्य करू असे आश्वासित केले,
नवनिर्वाचीत कार्यकारीणीची लिंगायत समाजातील सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment