डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर शिवैक्य
सातारा, दि.28 -प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्याचे समाजभूषण असलेले धोंडबे या गावचे सुपुत्र व सोलापूर येथे स्थायिक होऊन वैद्यकीय व्यवसाय व समाज कार्य यामध्ये भरीव योगदान देणारे डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर हे शुक्रवार दि.28 रोजी शिवैक्य झाले.
लिंगायत समाजाच्या जुन्या पिढीतील ते पाहिले एम. बी. बी.एस डॉक्टर होते.ते महाराष्ट्र वीरशैव सभा,पुणे चे संस्थापक आधारवड होते.सोलापूर जिल्ह्याचे प्रांताध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.तसेच सोलापूरच्या शैक्षणिक,सहकार व कृषी क्षेत्रातही भरीव योगदान दिले होते.श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे ते विद्यमान विश्वस्त होते.श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.श्री वीरशैव महाजन सभा ट्रस्टचे ते उपाध्यक्ष पण होते.समाजकार्यातील भीष्माचार्य व मार्गदर्शक श्रद्धास्थान म्हणूनही त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे त्यांच्या लिंगैक्य होण्याने समाज चळवळीतील एक विद्यापीठ काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वांना अतिशय दुःख झाले आहे.
त्यांना वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.ओम शांती!
No comments:
Post a Comment