Thursday, May 26, 2022

श्री शनी जयंती निमित्त सोळशी येथे अनेक कार्यक्रम


 श्री शनी जयंती निमित्त सोळशी येथे अनेक कार्यक्रम 
सातारा, दि.26 -  प्रा.अजय शेटे.प्रतिनिधी
शनिवार दि.28 ते सोमवार दि.30 मे अखेर श्री शनैश्वर जयंती निमित्त श्री क्षेत्र सोळशी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिश नंदगिरी महाराज यांनी दिली.
यावेळी समाजामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्री शनैश्वर कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .
शनिवार ते सोमवार अखेर येथील श्री शिव मंदिरात एक कोटी बेलार्पण व महारुद्राभिषेक केला जाणार आहे तसेच शनिवारी श्री शिवलीलामृत पारायण व इतर धार्मिक कार्यक्रम तसेच रविवारी दु.एक वाजता श्री शनी महात्म्य पारायण , गोपूजन,धर्म ध्वजवंदन व भजन आदी कार्यक्रम होतील सोमवारी पहाटे पासून धार्मिक विधी व दुपारी अडीच वाजता श्री त्यागेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाईल संध्या. सहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री शनैश्वर कृतज्ञता पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
यंदाचा युवा धर्मरक्षा पुरस्कार मा.धनंजय देसाई, भूमिपुत्र पुरस्कार मा.मंगेश धुमाळ,गोरक्षा पुरस्कार मा.शिवशंकर स्वामी, प्रगतशील शेतकरी पुरस्कार मा.जालिंदर सोळस्कर यांना देण्यात येणार आहे.त्यानंतर श्री शनैश्वर जन्मोत्सव सोहळा व महाआरती करण्यात येईल .
या कार्यक्रमाला सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी,द्वारकेचे जगद्गुरु सूर्योचार्य कृष्णानंदगिरी महाराज, शांतीगिरी महाराज,बुद्ध गिरी शितलगिरी  महाराज,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदींसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तेव्हा सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी हजर रहावे.असे आवाहन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट व सेवेकरी मंडळ यांनी केले आहे.
  तसेच हे हिंदू देवस्थान असून लिंगायत समाजाचे पवित्र असे स्थान आहे.येथे सर्व धार्मिक संस्काराचे जातं केले जाऊन अनेक गरजू विद्यार्थ्यांना शाळेत व धार्मिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.संस्थान तर्फे येणाऱ्या सर्व भक्तांना वेळेनुसार नाष्टा,भोजन व चहाचा महाप्रसाद दिला जातो.तसेच अनेक उपक्रम हे पूर्णपणे मोफत केले जातात.असे मा.नंदगिरी महाराज यांनी बुधवार दि.25 रोजी संध्या. 6 वा.संस्थान मध्ये दर्शनासाठी गेलेल्या श्री.सतीश शेटे,प्रा.एन .एस.गोडसे सर्,प्रा.नागनाथ स्वामी , श्री.प्रदिप शेटे,श्री अशोक काळे,डॉ.चंद्रशेखर येवले यांना सांगितले.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...