पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर येथे, म.बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शानदार उद्घाटन .
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर येथे , म.बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शानदार उद्घाटन .

सातारा , दि.30 - प्रा.अजय शेटे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर येथे शनिवार , दि.29 रोजी सकाळी 11.30 ते 2.30 या वेळेत म.बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्रशस्त सभागृहात विद्यापीठाचे पहिले संस्थापक कुलगुरू प्रा. डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आले. त्या नंतर उपस्थित सर्वांनी प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ.मृणालिनी फडणवीस या होत्या.त्यांच्याच विशेष प्रयत्नातून हे अध्यासन केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगयांचेकडून मंजूर करण्यात आले आहे. या नंतर सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.लोणी व कांबळे यांनी कन्नड बसव वचनांचे गायन केले. संस्कृत विभागाच्या प्रा.कु.तिवारी यांनी मा. इरेश स्वामी यांचा परिचय करून दिला. कु.ममता बोल्ली मॅडम यांनी अतिशय सुरेल आवाजात कार्यक्रमाचे निवेदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ.केदारनाथ काळवणे यांनी करून अध्यासनाचा उद्देश स्पष्ट केला.
यानंतर मंगळवेढ्याचे बसव साहित्य प्रचारक डॉ. आप्पासाहेब पुजारी यांनी म.बसवेश्वर यांचे वचन लेखन कार्य विषद करून अजून नवीन प्रकारे वचन साहित्य कसे निर्माण करणार आहे हे व इष्ठलिंग महत्त्व विषद केले.या वेळी या अध्यासन केंद्रासाठी त्यांनी पन्नास हजार देणगी जाहीर करून त्याचा चेक मा.कुलगुरू यांचेकडे सुपूर्द केला.प्रा. अरविंद लोणी यांची रु.पंचवीस हजार रुपये देणगी पण या वेळी जाहीर करण्यात आली.तसेच प्रा.तिवारी यांच्या बसव साहित्याचा पण आढावा घेण्यात आला.
केंद्रिय विद्यापीठ ,गुलबर्गा चे संचालक प्रा. डॉ.बी.बी.पुजारी यांनी म.बसवेश्वर यांची विचारसरणी विषद करून अतिशय सुरेल आवाजात बसव वचनांचे गायन करून दाखविले व उपस्थित सर्वांची मने जिंकली.
या नंतर विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की, म.बसवेश्वर हे समता नायक होते.त्यांचे जीवन चरित्र हे अतिशय प्रेरणादायी असे आहे.केवळ प्रधान मंत्री न रहाता या थोर विभूती ने सर्वसामान्य जन माणसांसाठी मानवतावादी कार्य केले.त्यांची कन्नड व मराठी वचने यांचा अभ्यास करून त्याचा नवा अर्थ माझ्या ग्रंथ संपदेतून मी इत्यंभूत पणे विषद करून त्यांच्या विचारांना नवीन दृष्टीने समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे .अशा थोर विभूतीच्या नावाने येथे सुरू होणाऱ्या अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले हे मी माझे परमभाग्य समजतो.
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, म.बसवेश्वर यांच्या अध्यासन केंद्राचे आज येथे उद्घाटन होताना माझ्या एका स्वप्नपूर्तीचा आनंद प्राप्त होत आहे. म.बसवेश्वर यांच्या जीवनकार्याचा सर्व सामान्य जीवनात प्रसार होऊन त्या माध्यमातून समाजात आदर्श विचारसरणी निर्माण झाल्यास समाज व्यवस्था अतिशय चांगली बनेल.असा मला विश्वास आहे.
या कार्यक्रमास प्र.कुलगुरू डॉ.राजेश गादेवार ,परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.शिवकुमार गणपूर , वित्त व लेखाधिकारी चार्टर्ड अकाउंटंट श्रेणिक शाह,कुलसचिव योगिनी घारे यांनी विशेष उपस्थिती लाभली.
या वेळी मा.कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या आवाहनानुसार म.बसवेश्वर अध्यासन केंद्राची रूपरेषा व कार्यपद्धती कशी असावी? या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा. अजय शेटे यांनी लेखी सूचना व कार्यवाही पत्र मा.कुलगुरू मॅडम यांना सर्वांसमक्ष सादर केले.तसेच सोलापूर बसव भक्त यांचे तर्फे मा.कुलगुरू मॅडम यांचा पुष्पगुच्छ देवून विशेष सन्मान करण्यात आला व अध्यासन केंद्रासाठी म.बसवेश्वर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म.शासन म.बसवेश्वर स्मारक समिती मंगळवेढा चे अध्यक्ष मा. डॉ.बसवराज बगले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सारणे, संघटक लक्ष्मीकांत पुजारी,सरचिटणीस परमेश्वर माळगे , प्रा.शिवानंद तडवळ, प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार, डॉ.भीमाशंकर भांजे, चन्नवीर भद्रेश्वरमठ,सुरेश वाले,महाबळेश्वर साखरे,प्रा.गजानन धरणे, जयदेवी ताई लिगाडे,विजयकुमार हतुरे यांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमास कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकार बंधू, विद्यापीठ शिक्षक,बसव अभ्यासक व भक्त,विद्यार्थी - विद्यार्थिनी,स्त्री - पुरुष श्रोते हजर होते.या वेळी सर्वांबरोबर उपस्थित सर्वांचे फोटो सेशन करण्यात आले व सर्व मान्यवरांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.
या अध्यासन केंद्रासाठी म. शासना तर्फे 3 कोटी रु.देण्यात आले असून , त्या रकमेच्या व्याजातून व दानशूर बसव भक्तांच्या व अभ्यासकांच्या प्रयत्नातून हे केंद्र चालवण्यात येणार आहे.त्या बद्दल महाराष्ट्र शासन व सर्वांचे विशेष आभार मानण्यात आले. मराठी विभागाचे शिक्षक प्रा.दत्तात्रय घोलप यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment