लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
कराड दि १६ :- रविंद्र वाकडे
राष्ट्रीय लिंगायत संघ यांचे वतीने सांगली येथे 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.संपन्न.
या वेळी बोलताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष चे मंगेशजी चिवटे म्हणाले की लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे ,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांना मदत करत आहोत या मुळे महात्मा जगद्गुरू महात्मा बसवण्णा यांना अभिप्रेत असणारे समाज कार्य माझ्या हातून घडत आहे हे मी माझे भाग्य समजतो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना सुरेश भाऊ खाडे या वेळी बोलताना म्हणाले कि महात्मा बसवेश्वर महाराजांनी 12 शतकात समाजातील वंचिंत आनि उपेक्षित घटक 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन लिंगायत धर्माची स्थापना आणि समाजा तील उपेक्षित घटकांना एकत्र आणले अशा या जगद्गुरू महात्मा बसवण्णा यांच काम हे जगात आदर्श वत आहे ,
असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली येथील राष्ट्रीय लिंगायत संघ यांच्या वतीने आयोजित बसव रत्न गौरव पुरस्कार सोहळ्यात केले, या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रा मध्ये विविध विभागात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय लिंगायत संघ यांचे वतीने सांगली येथे 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शरण राजशेखर तंबांखे,शरण उमाकांत होनराव ,शरण आनंद कर्णे ,शरण गंगाधर लकडे, राष्ट्रीय बसव दल खोजानवाडी,शरणी राजश्री सावर्डेकर ,शरण रविंद्र वाकडे यांना लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती सन्मान महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.सुरेशभाऊ खाडे, मा.मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षाचे प्रमुख मा.मंगेश जी चिवटे,राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदिप बापू वाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महत्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .
राष्ट्रीय लिंगायत संघ , संस्थापक अध्यक्ष प्रदिप बापू वाले समाजास संबोधित केले .या वेळी बसवपीठावर महाराष्ट राज्याचे कामगार मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे , मुख्यमंत्री आरोग्य सहायत्ता कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे सुमित कदम , अध्यक्ष डॅा विनोद परमशेट्टी , तहसीलदार राजेद्र कुंभार , शिवसेना जिल्हाघ्यक्ष संजय विभुते , जेष्ठ विश्वनाथ मिरजकर , संजय हिरेकर , मिलींद साखरपे , राजशेखर तंबाके , राजेद्र कुंभार , गटनेते मेघना हिंगमिरे , सरिता पट्टणशेट्टी , रूपाली गाडवे , रविंद्र बुकटे , सुरेद्र बोळाज , राजाराम पाटील , कैलाश स्वामी व लिंगायत बांधव उपस्थित होते .
या वेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मा विनायाक चिवटे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा ना श्री सुरेश (भाऊ) खाडे पालक मंत्री सांगली जिल्हा हे होते .
प्रशस्तीपत्र या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय लिंगायत संघाने या सर्व समाज बांधवांच्या कार्याची दखल घेवून पुरस्कार सोहळा आयोजित आहे. या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या कार्यक्रमा साठी सातारा आणि सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते





No comments:
Post a Comment