Saturday, April 22, 2023

महात्मा बसवेश्वर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी.डॉ.श्यामसुंदर झळके

 महात्मा बसवेश्वर यांचे कार्य समाजासाठी  प्रेरणादायी.डॉ.श्यामसुंदर झळके




महात्मा बसवेश्वर यांचे कार्य समाजासाठी  प्रेरणादायी.डॉ.श्यामसुंदर झळके


                                                        

सिन्नर दि ;- २२  प्रतिनिधी 

 बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील विषमता,अंधश्रध्दा,अस्पृश्यता ,जातीभेद नष्ट करण्यासाठी मोठा लढा दिला.त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,बहि:षाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. विजयनगर येथील महात्मा बसवेश्वर चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.महात्मा बसवेश्वरांनी स्वातंत्र्य,बंधुता,न्याय व समतेची शिकवण दिली. विजयनगर मित्र मंडळ,अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिवजन्मोत्सव समिती,सिन्नर तालुका वीरशैव लिंगायत सामाजिक संघटना, माजी सैनिक संघटना , बारा बलुतेदार संघटना यांच्यावतीने 

 महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महामित्र दत्ता वायचळे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या तरुण पिढीला दिशादर्शक आहे तर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ तांबे यांनी महात्मा बसवेश्वर यांनी समतेचा विचार सांगून लोकशाहीचा पाया रचला.आंतरजातीय विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिले असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते डॉ.मनोहर दोडके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक क्रांतीची माहिती दिली. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे,अंकुश दराडे यांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.विजय लोहारकर,उपाध्यक्ष मुकुंद वाळेकर, संघटक विजय आश्टुरे,सचिव संतोष वाळेकर,राहुल घोंगाणे,मंगेश वाळेकर,आशुतोष घोंगाणे,विजय गवंडर,मधुकर सोनवणे,विनायक सूर्यवंशी,मिलिंद जाधव,अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे बाबासाहेब कलकत्ते, शिवजन्मोत्सव समिती चे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे आदि उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...