साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम येथे सामाजिक उपक्रमाने साजरा.
साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम येथे सामाजिक उपक्रमाने साजरा.

कडेगाव दि १६ :- अंश खलीपे
रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांचे पुतणे चि.साईश खलिपे याचा प्रथम वाढदिवस आणि चि.इंद्रनील खलिपे याचा चौथा वाढदिवस रुद्राक्षा फौंडेशन संचलित अंशजल सामाजिक वाढदिवस या उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
आजच्या कलियुगात वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांना वृद्धांबद्दल आस्था व प्रेम संपत चालले आहे. हे असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की, घरात मुलांना संस्कार द्यायला आजी-आजोबाच राहणार नाहीत. लहानपणापासूनच मुलांना योग्य संस्कार दिले तर ती मुलं मोठी झाल्यानंतर देखील आपली कर्तव्य विसरत नाहीत. याचाच विचार करत रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांचे वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम, येळावी येथील वृद्धांसमवेत केक कापून सर्वांना नाश्ता देऊन साजरा केला. तसेच पोलीस फाट्यावरील ऊसतोड कामगार व त्यांच्या लहान मुलांना खाऊवाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे, फौंडेशनच्या सचिव सौ.शोभा खलिपे, गोविंद वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ. अलका पाटील, शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अमरदीप खलिपे व सचिव श्रीकांत खलिपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सौ.अलका पाटील म्हणाल्या, आजकालच्या पिढीने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून असे कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांचे वाढदिवस वृद्धाश्रमात येऊन साजरे केले आणि आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल त्यांचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांना कोणत्याही गोष्टीची पैशाची अपेक्षा नसते त्यांना फक्त याकाळात प्रेमाची जास्त गरज असते आणि तेच प्रेम आज संपूर्ण खलिपे कुटुंबीयांनी येथे वृद्धांसमवेत वेळ घालवून, त्यांच्याशी बोलून, त्यांची विचारपूस करून दिलेले आहे. येथून पुढे देखील रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.अंश खलिपे व त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून असे कार्य घडत राहो हीच सदिच्छा.
वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी इंद्रनील व साईश यास आशीर्वाद देऊन त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी सौ.पूजा खलिपे, चि.इंद्रनील खलिपे, चि.साईश खलिपे व वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबा उपस्थित होते.

No comments:
Post a Comment