म.बसवेश्वर यांची 918 वी जयंती वडूज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न.
म.बसवेश्वर यांची 918 वी जयंती वडूज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न.
सातारा, दि.23 - प्रा.अजय शेटे.
वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे म.बसवेश्वर यांची 918 वी जयंती वीरशैव लिंगायत समाज संघटने तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.वडूज नगरपंचायत,तहसील कार्यालय ,पंचायत समिती येथेही निवासी अधिकारी यांचे हस्ते म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून शासकीय पार पडला.
शनिवार सकाळी 9.00 वा. म.बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अध्यक्ष सचिन शेटे व श्री बालाजी स्वामी यांच्या हस्ते करण्यात येऊन आरती करण्यात आली.त्यानंतर दुपारी 3 ते संध्या 5.30 या वेळेत श्री विश्वाराध्याय महिला मंडळ, वडूज यांनी अथर्वशिर्ष व रूद्र पठण केले. संध्या.6.30 वा. म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेची मिरवणूक श्री.देवकर , कातरखटा व यांच्या अश्वारूढ सुशोभित वरात गाडीतून काढण्यात आली.
मिरवणुकीसमोर धनाजी ब्रॉसबॅन्ड कंपनी , वडूज यांनी सुश्राव्य भक्ती संगीत सादर केले.श्री मारुती मंदिर - शेतकरी चौक - बाजार चौक - शिवाजी चौक - एस. टी.स्टँड मार्गे हुतात्मा स्मारक मार्गे मिरवणूक माघारी श्री.हनुमान मंदिर येथे माघारी आली यावेळी वडूज चा आठवडा गर्दी बाजार असून सुद्धा वडूज पोलीस स्टेशनच्या महिला व पुरुष कॉन्स्टेबल यांचे तर्फे यात्रा मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला गेला होता.त्यामुळे मिरवणूक अतिशय व्यवस्थित पार पडली.मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवून, म.बसवेश्वर महाराज की जय !,लिंगायत धर्माचा विजय असो!अशा घोषणा देण्यात आल्या .सर्व शरण व शरणी यांनी लिंगायत धर्माचे ध्वज हाता मध्ये धरून फडकवले होते.सर्वांना म.बसवेश्वर यांच्या चित्राचे भगवे फित बिल्ले लावण्यात आले होते.
त्यानंतर श्री मारुती मंदिर येथे नवीन पदाधिकारी ,पोलीस मित्र अतिथी मंडळी श्री दिलीप ढोले,मंत्रालय सहाय्यक श्री .अभय भुंजे,शुभम डोंबे ,योगेश लिगाडे अंबवडे ,तुकाराम भादुले आण्णा यांचा जेष्ठ नागरिकांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.यानंतर म.बसवेश्वर यांचे जीवन कार्य विषद करताना प्रा.अजय शेटे म्हणाले की, म.बसवेश्वर यांनी बाराव्या शतकाच्या प्रारंभी सुरू केलेली कल्याण क्रांती ही जगातील पहिली क्रांती आहे.बसव विचार हा जगातील सर्वात पहिला विचार आहे.शरण चळवळ ही पण जगातील पहिली चळवळ आहे आणि अनुभव मंडप ही पण जगातील पहिली लोकशाही संसद आहे. म.बसवेश्वर यांनी पाताळ व स्वर्ग - नरक या कल्पनेपेक्षा पृथ्वी वरील हयात माणसाच्या जीवनाचा विचार केला.स्त्री - पुरुष यांना समान लेखले.23 हजार वचने लिहून देव हा पशू-पक्षी, झाडे यांच्यात नसून माणसातच आहे.स्त्रिया या देवी असून,पुरुष देव आहेत. जीवनात 'तूच मूर्ती आणि तूच मूर्तिकार ' असा संदेश त्यांनी समस्त मानव जातीला दिला.देवळातल्या देवाला इष्ट लिंगाच्या रूपाने सर्व सामान्य माणसाच्या हृदयावर आणून बसवले.अशा या महान विभूतीचा समस्त भारत वर्षाला अभिमान आहे.
या नंतर प्रा.नागनाथ स्वामी यांनी आपल्या सांगितले की,समाजाने सर्व कार्यक्रमात वेळेत हजर राहून सहकार्य करणे अपेक्षित आहे. म. बसवेश्वर यांनी कर्मकांडातील देव मानला नाही तर भक्तिभावातील देव आपलासा केला. व सर्व लिंगायत समाजाला सुलभ भक्तीचा मार्ग उपलब्ध करून दिला. या वेळी त्यांनी सर्वांकडून '
' ओम नमः शिवाय! ' हा मंत्र पठण करून घेतला.
या नंतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.यावेळी आजच्या मंदिरातील कार्यक्रमाला हजर असणाऱ्या महिला शरणी वर्गाची एक समिती गठीत करण्याचे निश्चित करण्यात आले.तसेच या पुढील कार्यक्रम हा संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून करण्याचे निश्चित करण्यात आले.या नंतर ओंकार मंगल कार्यालय येथे सर्वांना महाप्रसाद अन्नदान करण्यात आले.या कार्यक्रमाला आतार मंडप डेकोरेटर्स यांचे तर्फे लाऊड स्पीकर व इलेक्ट्रिक रंगीत बल्ब माळा यांची आरास करण्यात आली होती. ओंकार डेकोरेटर्स यांचे तर्फे म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेची फुलांची व रंगीत पडदे यांची सुशोभित बैठक व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमाला एकूण एक हजार स्त्री - पुरुष भाविक भक्त हजर होते.



No comments:
Post a Comment