महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शनिवारी सोलापुरात उद्घाटन.
महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शनिवारी सोलापुरात उद्घाटन.
सातारा, दि.27 - प्रा.अजय शेटे.
सर्व बसवप्रेमी अभ्यासक,संशोधक,लेखक, अनुवादक, बसवतत्व प्रसारक बंधू भगिनीं यांच्या बऱ्याच वर्षांच्या मागणी नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रास राज्य सरकारने मंजूरी दिली असून ,त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 3 कोटी रूपयांची तरतूदही केली आहे. त्या रकमेच्या ठेवीच्या व्याजातून मिळणारी रक्कम दरवर्षी 25 लाख खर्च करून भविष्यात येथे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.त्याविषयीची कार्यपद्धती उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासन निश्चित करीत आहे.
महात्मा बसवेश्वर महाराजांचे जीवनचरित्र, वचन साहित्याचे भाषांतर, विश्लेषण,बसव साहित्यिकांचे विविध प्रकारचे साहित्य, प्रकाशन, कन्नड भाषेतील बसव साहित्याचा मराठीत अनुवाद,शालेय पाठ्यक्रमात समावेश, एम.फील,पीएच डी चा अभ्यासक्रम,प्रबंध लेखन,आणि बसवेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राचा प्रसार व प्रचार आणि प्रकाशन यासाठी सर्वांच्या सूचना व सहभाग विचारात घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या सर्व कार्य पूर्ती करिता शनिवार, दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता ' महात्मा बसवेश्वर ' अध्यासन केंद्राचा शुभारंभ व उदघाटन समारंभ विद्यापीठात होणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा आणि विद्यापीठ प्रशासनाचा असल्याने कोणताही राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनेचा या विषयात संबध असणार नाही. तसेच या अध्यासन केंद्राविषयीची आपली संकल्पना काय आहे.याचे एक लेखी निवेदन आपण मा.कुलगुरू यांना देवून आपली भूमिका मांडण्याचा अधिकार बसव अभ्यासकांना देण्यात आला आहे. दरम्यानच या कार्यक्रमा नंतर सर्वांना विद्यापीठ सभागृहात एकत्रित येऊन संवादातून विचारमंथन व परिचय करून घेता येणार आहे .तशा स्वरूपाच्या
आपल्या सूचना, संकल्पना,विचार लेखी स्वरूपात आणून जाणीवपूर्वक या उद्घाटन समारंभात आपली उपस्थिती आणि सहभाग नोंदवून बसव साहित्य दासोहाचे योगदान द्यावे.असे आवाहन महाराष्ट्र शासन नियोजित म.बसवेश्वर स्मारक कृती समिती अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी केले आहे.
.png)

No comments:
Post a Comment