शिखर शिंगणापूर येथील कोटी लिंगार्चन सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ
शिखर शिंगणापूर येथील कोटी लिंगार्चन सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ
सातारा, दि.18 - प्रा.अजय शेटे
तीर्थक्षेत्र फाऊंडेशन तर्फे शिखर शिंगणापूरच्या पावन भूमी मध्ये महाशिवरात्र पर्वकाळ गुरूवार दि.16 फेब्रुवारी ते सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी कोटी लिंगार्चन व लक्षभोजन सोहळा आयोजित केला गेला आहे.या भव्य सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ रविवार दि.25.12.2022 रोजी दु.1 वा.विविध संत महात्म्यांच्या सानिध्यात संप्पन्न होत असून,या सोहळ्याचा व सत्संगाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तीर्थक्षेत्र फाउंडेशन यांनी केले आहे.
हा भूमीपूजन समारंभ प. पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी ,श्री काशी महापीठ ,वाराणसी यांच्या शुभहस्ते संप्पन्न होत आहे.यावेळी त्यांच्या समवेत प.पू. श्री ष ब्र 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज ( मठाधिपती शिखर शिंगणापूर ), प.पू.श्री. व. ब्र .108 सद्गुरू महादेव शिवाचार्य स्वामीजी,वाई (वाईकर महाराज) पू.श्री. ष. ब्र.108 पद्म भास्कर डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज ,तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान , धारेश्वर मठ , धारेश्वर.श्री. प. ब्र.108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान, बेळंकी. (बेळंकीकर महाराज )हे वीरतपस्वी व तपोरत्न महाराज उपस्थित राहणार आहेत.
प.पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रथमच श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर नगरी मध्ये आगमन होत असल्या मुळे भव्य मिरवणूक व शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.या सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती कार्यक्रमाचे निमंत्रक श्री.मोहन बडवे , मा.अध्यक्ष ,तीर्थक्षेत्र फाउंडेशन , मा. शेखरजी मुंदडा , मा.स्वागताध्यक्ष कोटी लिंगार्चन सोहळा ,समस्त वीरशैव लिंगायत समाज ,शिखर शिंगणापूर व समस्त ग्रामस्थ शिखर शिंगणापूर यांनी केली आहे.
या कार्यक्रमासाठीचा संपर्क क्रमांक 9420270126 व 9420270226 असून ,कार्यक्रमाचे स्थळ उमाबन ,शिखर शिंगणापूर, ता. माण, जि.सातारा आहे .
तरी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी अवश्य घ्यावा असे आवाहन संयोजक समितीने केले आहे.



No comments:
Post a Comment