Saturday, December 24, 2022

संघ - जनसंघ ते भाजपचा अभेद्य सेतू ,कै.वसंतराव नारायण शेटे यांचा 9 वा स्मृतिदिन.

 संघ - जनसंघ ते भाजपचा अभेद्य सेतू ,कै.वसंतराव नारायण शेटे यांचा 9 वा स्मृतिदिन.



संघ - जनसंघ ते भाजपचा अभेद्य सेतू ,कै.वसंतराव नारायण शेटे यांचा 9 वा स्मृतिदिन.



सातारा, दि.25 -रविंद्र वाकडे.  

 कै. मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनीच मार्गशीर्ष गुरुवार  25 डिसेंबर  2013 दिवशीच कै.वसंतराव शेटे यांचे निधन झाले.हा एक दैवी योगायोगच होय.

 सन 1925 विजयादशमी ला रा. स्व.संघाची स्थापना नागपूर येथे डॉ.हेडगेवार यांनी केली. वडूजचे डॉ.आंबिके हे 1926 पासून त्यातील एक अनुयायी व त्यांच्याबरोबर पहिले स्वयंसेवक म्हणून कै.नारायण शेटे संघाशी संबंधित व्यक्ती.सुरुवातीला संघाची सुरुवात ही फक्त उत्सव साजरा करून झाली व त्या माध्यमातून देशप्रेमी विचार समाजात पसरू लागले होते.

4 जानेवारी 1924 रोजी वसंतराव शेटे यांचा जन्म झाला.रक्तातच वडिलार्जित देशप्रेमी संस्कार होते.7 वी पर्यंतचे शिक्षण औंध संस्थान मधून झाले.पुढील शिक्षण पूर्ण न होता वडिलार्जित किराणा व्यवसाय करावा लागला.

सन 1948 ला म.गांधी हत्याकांड झाले आणि त्यानंतर डॉ. आंबिके यांच्या हॉस्पिटलचे जळीतकांड झाले.शेटे कुटुंबाच्या घरावर सुद्धा त्यावेळी टांगती तलवार राहिली.नारायण शेटे आणि वसंतराव शेटे सलग 3 महिने  स्वतःच्या घराचा रात्रपहारा हत्यारे घेवून करत होते.शेवटी संकट टळले परंतु त्याचा परिणाम नारायण शेटे यांच्या तब्येतीवर होऊन हाय खावून त्यांचा पुढे लवकरच मृत्यू झाला.

डॉ.यशवंतराव पेठे हे कोकणातील गुहागर येथून नुकतेच  1950 साली येवून  कातरखटाव येथे वैद्यकीय व्यवसाय करत होते.स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ आंबिके,वसंतराव शेटे,वसंतराव  कांबळे,विश्वनाथ येवले, भालचंद्र गोसावी,कृष्णात गाडवे यांनी विनंती करून त्यांना वडूज येथे वैद्यकीय व्यवसाय करण्यास आग्रह करून तालुक्यातील रुग्णांची मोठी सोय करून दिली.

डॉ.यशवंत पेठे व वसंतराव शेटे या जोडीने मिळून पुढे कांबळे,येवले,गाडवे कुटुंबाच्या सहकार्याने वडूज सह खटाव तालुक्यात अतिशय जोमाने संघ कार्य सुरू केले. कोळे व वडूज या सातारा जिल्ह्यातील सर्वात पहिल्या संघ शाखा ठरल्या. मा.उत्तमराव पाटील,विश्वास गांगुर्डे यांच्याबरोबर प.महाराष्ट्रात  कार्य केले , वडूज मधील शिवसेनेच्या सभेत मा.बाळासाहेब ठाकरे यांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले. सन 1947 पासून वडूज मध्ये स्वतःचा वृत्तपत्र व्यवसाय सुरू केला.जनता पक्षाच्या काळात मोठ्या हिरीरीने काम केले.सन 1942 च्या वडूज मधील स्वातंत्र्य आंदोलनात  हुतात्मे व स्वातंत्र्यवीर यांना  मोठे सहकार्य केले होते. 'तन - मन - धन राष्ट्र आराधना ' त्यांनी अखेर पर्यंत जपली. विटा बँकेचे ते स्थानिक शाखा सल्लागार होते.खटाव व माण तालुक्यातील रस्ते,वीज,पाणी ,शिक्षण,आरोग्य याबाबतच्या मागण्या  वारंवार शासनास कळवून त्या राबविण्यास भाग पाडले.

पुढे संघाचा सहभाग राजकारणात झाला व जनसंघ नावाची राजकीय संघटना उभी राहिली यावेळी वसंतराव शेटे यांनी जनसंघाच्या तिकिटावर सन 1962 साली पहिल्यांदा जि. प. व  सन 1967 ला विधानसभा निवडणूक लढवली व क्रमांक दोनची मते मिळवली.पुढील काळात पक्षाच्या आदेशाने वेळोवेळी मा. केशवरावजी पाटील आण्णा, मा.चंद्रहार  पाटील दादा , मा.भाऊसाहेब गुदगे यांच्या अपक्ष काळातील उमेदवारीत व विजयात मोठे सहकार्य केले. पुलोद आघाडी मध्ये शरदरावजी पवार साहेब यांना संघटनेने मोठी  ताकद दिली. खटाव आणि माण तालुक्यात देशप्रेमी  कार्यकर्ते  व त्यांची संपूर्ण देशप्रेमी घराणी उभी करण्याचे खूप मोठे कार्य केले.

देशात आणीबाणी जाहीर झाल्यानंतर डॉ.यशवंत पेठे यांना 3 महिने व वसंतराव शेटे यांनी 19 महिने राजकैदी म्हणून पुणे,नाशिक येथे कारावास भोगावा लागला.त्यावेळी  त्यांच्याबरोबर तुरुंगात एकाच खोलीत मा.आण्णासाहेब डांगे पण होते .

पुढे सन 1980 साली जनसंघाचे रूपांतर भाजपामध्ये झाले आणि  पाहिले खटाव तालुका अध्यक्ष होण्याचा बहुमान वसंतराव शेटे यांना मिळाला.खटाव आणि माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाजपाचे कार्य उभे राहिले. सन 1981ला अटलजी सातारा जिल्ह्यात आले तेव्हा जिल्ह्यातर्फे  एक लाख रुपयांची देणगी त्यांना पक्ष कार्यासाठी देण्यात आली.यात खटाव तालुक्यातून मोठे योगदान वसंतराव शेटे यांनी दिल्यामुळे अटलजी वडूज मध्ये येवून घरी जेवून पुढे कराडला गेले.

त्यानंतर मा. ग्राम विकास व आदिवासी विकास मंत्री आण्णासाहेब डांगे ,पुण्याचे आमदार मा.नारायण वैद्य,अरविंद लेले,  प्रा ना.स. फरांदे ,प्रकाशजी जावडेकर ,प्रमोदजी महाजन,गोपीनाथजी मुंडे  यांनी पक्ष कार्यासाठी वारंवार वडूज येथे येवून गृहभेट  घेतली.

छ.शहाजी राजे भोसले महाराज  यांच्या काळापासून कुलकर्णी ,पाटील,देशमुख,देशपांडे,शेटे व महाजन या घरण्याना महाराष्ट्रात वतनदारी होती त्यामुळे वसंतराव शेटे यांनाही फार पूर्वीपासून गावचे नगरशेठ म्हणून मान मिळाला.ते वडूज शिक्षण विकास मंडळाचे संचालक होते.

संपूर्ण 90 वर्षाच्या आयुष्यात अतिशय निष्ठेने रा.स्व.संघ - जनसंघ - भाजप अशा चढत्या क्रमाने भाजपाची प्रगती पाहण्याचा योग आला. सन 1995 ते 2000 मधील पहिल्या युती शासनामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद घेता आला.

अशा या तत्वनिष्ठ नेत्याला 9 व्या  स्मृतिदिना निर्मितआपला सातारा न्यूज परिवाराचे वतीने  विनम्र अभिवादन .

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...