'विजयानंद ' चित्रपट देशभर प्रदर्शित व्ही.आर.एल लॉजिस्टिक ( VRL) ची यशोगाथा मोठ्या पडद्यावर संस्थापक सर्वेसर्वा मा.विजयानंद जी .संकेश्वर यांची प्रेरणादायी जीवनयशगाथा रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी दाखल
'विजयानंद ' चित्रपट देशभर प्रदर्शित व्ही.आर.एल लॉजिस्टिक ( VRL) ची यशोगाथा मोठ्या पडद्यावर संस्थापक सर्वेसर्वा मा.विजयानंद जी .संकेश्वर यांची प्रेरणादायी जीवनयशगाथा रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी दाखल
सातारा, दि.14 - प्रा.अजय शेटे .
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) चे संस्थापक सदस्य तथा मार्गदर्शक व भारतातील सर्वात मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष तथा लिंगायत भूषण मा.विजयानंद जी.संकेश्र्वर यांचे प्रेरणादायी जीवन चरित्र उलघडून दाखवणारा ' विजयानंद ' या नावाचा चित्रपट सोमवार दि.12 रोजी संपूर्ण भारतभर हिंदी सह अन्य भाषांत प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात विजयने आपल्या वडिलांचा वडिलोपार्जित पुस्तक विक्रीचा व्यवसाय सोडून सामान ने - आण करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला.या दरम्यान त्याच्या वडिलांना खूप संघर्ष करावा लागतो.मात्र त्यानंतर अतिशय कठोर परिश्रम करून विजयानंद हा व्हि.आर.एल.अर्थात विजयानंद रोड लाईन्स ( VRL) या लॉजिस्टिक कंपनीचा मालक होतो. आपल्या भारत देशात सर्वाधिक वाहने ठेवून माल ने - आण करण्याचा विक्रमही विजयाच्या नावावरच नोंद झाला आहे.
या चित्रपटाची कथा ही त्यांचा मुलगा आनंद संकेश्र्वर व त्यांनी स्वतःच लिहिली आहे.त्यामुळे चित्रपटाचे नाव दोघांचे नाव मिळून ' विजयानंद ' असे ठेवले आहे.तेव्हा प्रत्येकाने आवर्जून पहावा असा संपूर्ण देशभर प्रदर्शित झालेला प्रेरणादायी चित्रपट आहे.
मा.विजयानंद यांचा वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन सह सर्व समाज बांधवांना अभिमान वाटत आहे . ' विजयानंद ' या चित्रपटास वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) , लिंगायत TV Live ,समस्त लिंगायत समाज यांचे वतीने हार्दिक शुभेच्छा




No comments:
Post a Comment