शिखर शिंगणापूर येथील कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ संपन्न
शिखर शिंगणापूर येथील कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ संपन्न
सातारा, दि.26 - प्रा.अजय शेटे.
तीर्थक्षेत्र फाऊंडेशन तर्फे शिखर शिंगणापूरच्या पावन भूमी मध्ये महाशिवरात्र पर्वकाळ गुरूवार दि.16 फेब्रुवारी ते सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी कोटी लिंगार्चन व लक्षभोजन सोहळा आयोजित केला गेला आहे.या भव्य सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ रविवार दि.25.12.2022 रोजी दु.1 ते 4 या वेळेत विविध संत महात्म्यांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला .
हा भूमीपूजन समारंभ प. पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी ,श्री काशी महापीठ ,वाराणसी यांच्या शुभहस्ते संप्पन्न झाला .यावेळी त्यांच्या समवेत प.पू. श्री ष ब्र 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज ( मठाधिपती शिखर शिंगणापूर ), प.पू.श्री. व. ब्र .108 सद्गुरू महादेव शिवाचार्य स्वामीजी,वाई (वाईकर महाराज) पू.श्री. ष. ब्र.108 पद्म भास्कर डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज ,तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान , धारेश्वर मठ , धारेश्वर.श्री. प. ब्र.108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान, बेळंकी. (बेळंकीकर महाराज ), प.पू.मन्ना महाराज या वीरतपस्वी व तपोरत्न महाराज यांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला.
प.पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रथमच श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर नगरी मध्ये आगमन झाल्या मुळे भव्य मिरवणूक व शोभायात्रा आयोजित करण्यात आली व त्यांच्या हस्ते श्री शंभू महादेवास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर 'उमाबन ' येथील प्रशस्त जागेत भूमीपूजन करण्यात येवून कुदळ मारण्यात आली. श्री.मोहन बडवे , मा.अध्यक्ष ,तीर्थक्षेत्र फाउंडेशन , मा. शेखरजी मुंदडा , मा.स्वागताध्यक्ष कोटी लिंगार्चन सोहळा ,समस्त वीरशैव लिंगायत समाज ,शिखर शिंगणापूर व समस्त ग्रामस्थ शिखर शिंगणापूर,श्री.मंदार बडवे,चिन्मय बडवे ,नागेश बडवे,अक्षय महाराज भोसले,आनंद कुलकर्णी,बाळासाहेब खाडे,वीरभद्र कावडे, शितल बडवे , अनिल बडवे,शिवकुमार शास्त्री , संदिप खाडे यांनी कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले होते.सर्वांचा अतिशय यथोचित असा सत्कार करण्यात आला.
श्री प.पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज यांनी सर्व पंचाचारा मधील जंगम पूजन व त्याचे महात्म्य अतिशय अभ्यासपूर्ण व ज्ञानपूर्ण रितीने कथन केले.
यानंतर जगद्गुरु मल्लिकार्जुन महास्वामीजी आपल्या भाषणात म्हणाले की,तीर्थ क्षेत्र फाउंडेशन,शिखर शिंगणापूर यांनी या कार्यक्रमाचे खूप मोठे धनुष्य पेलले आहे.एखादे चांगले काम करताना अनेक समस्या उभ्या राहतात.परंतु येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करण्याचे बळ श्री शंभू महादेव देईल.या सोहळ्यासाठी पूजन करण्यात येणाऱ्या प्रत्येक 'कंकर ' मध्ये श्री शंकर वसलेले असून,हे सर्व एक कोटी ' कंकर ' हे पवित्र अशा नर्मदा नदी मधून प्राप्त केले आहेत.त्याचे पूजन करण्याचे भाग्य अनेक भाग्यवान दाम्पत्यांना मिळणार आहे.शिवाय यावेळी लक्ष भोजन अन्नदान करण्यात येणार आहे.हे सर्वात मोठे पुण्याईचे काम आहे. याआधी असा कार्यक्रम फक्त कर्नाटक राज्यात झाला होता.परंतु तो सर्व प. पू.महाराज यांनी आयोजित केला होता.मात्र हा येथील कार्यक्रम हा सर्वसामान्य अशा सर्व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला असून,याचे महत पुण्य सर्वांनी प्राप्त करून घ्यावे.
शिंगणापूर पोलीस स्टेशन चे पोलीस सब इन्स्पेक्टर मा.भुजबळ साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवला होता .
या कार्यक्रमाला प्रा.नागनाथ स्वामी, नंदकुमार खोत,गुरुलिंग स्वामी, लिंगराज साखरे,दिलीप ढोले, गुरुलींग तोडकर,अविनाश तोडकर,बसवेश्वर येवले,राजेंद्र शेटे,रविंद्र गाडवे , सुरेश म्हामणे श्रीकांत म्हामणे,सागर म्हामणे,उमेश कुलकर्णी व हजारो स्त्री - पुरुष भाविक भक्त हजर होते.


No comments:
Post a Comment