ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन
ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन
सातारा, दि.28 - रविंद्र वाकडे.
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( VIA)वीरशैव लिंगायत समाजाच्या एकमेव अशा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनेच्या वतीने लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे व लिंगायत भुषण मा.सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्रात आतापर्यंत 8 बिझनेस एक्स्पो, व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे, नोकरी मेळावे आयोजित केले गेले आहेत व आता महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी,शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, होतकरू तरुण, तरुणी यांच्यासाठी जगभरातील वीरशैव लिंगायत उद्योगपती,साॅफ्टवेअर कंपनीचे सीईओ,ॲग्री एक्सपर्ट , एज्युकेशन स्टार्टअप कंपनी या व इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज उद्योजकांना भेटण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्या येत आहे.
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनने आएलवायएफ,बसव समिती, वीरशैव समाज ऑफ अमेरिका,एआयव्हीएम,या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वीरशैव लिंगायत संघटनांना बरोबर घेऊन बेंगलोर येथे लिंगायत समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बिझनेस समिटचे, बेंगलोर येथे शुक्रवार, दि 20 ,शनिवार 21 व रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी आयोजण केले गेले आहे.*
यात जगभरातील प्रमुख अशा उद्योजकांचे 300 स्टाॅल्स असणार आहेत व यातून एकमेकांना व्यापार करण्यासाठी मोठी बाजारपेठ व नवीन व्यावसायिक संधी निर्माण करून दिली जाणार आहे.
या ऐतिहासिक व भव्यदिव्य अशा कार्यक्रमात सहभागी होणें साठी व अधिक माहितीसाठी कृपया मा.प्रदिप साखरे ,वर्किंग कमिटी,ग्लोबल बिझनेस काँनक्लेव,बेंगलोर मा.अध्यक्ष व्हाया युथवींग 9923610610 व मा. पी.आय.गुड्डिमठ, वर्किंग कमिटी,ग्लोबल बिझनेस कॉनक्लेव्ह बेंगलोर ,जनरल सेक्रेटरी ' व्हाया '9850441438 यांचेशी संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमात मा.बाबासाहेब कल्याणी,डॉ.विजय संकेश्र्वर ,डॉ.अजयकुमार, डॉ. शामनुरू शिवशंकराप्पा,डॉ.प्रभाकर कोरे, मा.जगदिश शेट्टर, मा.लक्ष्मण सावदी, मा.मुर्गेश आर. निराणी , मा.अरविंद जत्ती, मा.ईश्वर खंद्रे, मा.एम.बी.पाटील, मा.आण्णासाहेब एस. जोल्ले, मा.शिवकुमार उडसी, मा.अरविंद बेल्लाद, मा.बी. वाय.विजयेंद्र, मा.ओमप्रकाश कोयटे, मा.सुनील रुकारी,नवीन कोट्टीगे, मा.संतोष केनचेंबा, मा.नेत्रावती चेन्नमा या मार्गदर्शकांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.**

No comments:
Post a Comment