मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त
मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त
उदगीर दि 25 :- संगम पटवारी प्रतिनिधी लिंगायत TV Live
मौ. गंगापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक सन २१ ते २५ अंतर्गत प्रभाग क्रमांक २ मधून सर्वसाधारण स्ञी या जागेवर निवडणूक लढवून प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या या निवडणुकीच्या अनुषंगाने मौजे गंगापूर ता. उदगीर ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव सुटलेले असल्याने त्यांनी सरपंचपदासाठी नामनिर्देशन अर्ज भरून (ता. ११) फेब्रुवारी २१ रोजी बहुमताने सौ. जयश्री नागभूषण बिरादार यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. सौ जयश्री नागभूषण बिरादार यांनी मा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर यांच्याकडे वाणी या जातीच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी अर्ज दाखल केला होता, त्या अर्जाच्या अणूषंगाने त्याच्या विरोधात गावातील महानंदा गुरुलिंग स्वामी यांनी आक्षेप/तक्रार नोंदविली होती . या जाती-दाव्याच्या प्रकरणात मा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन सौ जयश्री नागभूषण बिरादार यांनी दाखल केलेल्या वाणी या जातीच्या दाव्याबाबत( दि .16) सप्टेंबर रोजी न्यायनिर्णय देऊन व तसेच वाणी या जातीचे जात प्रमाणपत्र वैध ठरवून त्यांना वाणी या जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी गंगापूर च्या सरपंच सौ. जयश्री नागभूषण बिरादार यांची बाजू वकील म्हणून अँड प्रसाद काळे पाटील, औरंगाबाद यांनी प्रखरपणे बाजू मांडली आणि तसेच अँड दिपक मंगले या वकीलाने त्यानां साह्य केले आक्षेपदार/तक्रारदार यांचे वकील म्हणून अँड विष्णू गाडेकर यांनी काम पाहिले.



No comments:
Post a Comment