रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक ॲड.अंश खलिपे यांचा वाढदिवस फौंडेशनच्या 'अंशजल सामाजिक वाढदिवस' उपक्रमांतर्गत जि.प.शाळा बेलवडे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप ,
रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक ॲड.अंश खलिपे यांचा वाढदिवस फौंडेशनच्या 'अंशजल सामाजिक वाढदिवस' उपक्रमांतर्गत जि.प.शाळा बेलवडे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप .
कडेगाव दि २३ :- दिलीप महाजन प्रतिनिधी
रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक ॲड.अंश खलिपे यांचा वाढदिवस फौंडेशनच्या 'अंशजल सामाजिक वाढदिवस' उपक्रमांतर्गत जि.प.शाळा बेलवडे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून साजरा करण्यात आला.
अंशजल सामाजिक वाढदिवस उपक्रमाबाबत सांगताना ॲड.अंश खलिपे म्हणाले की प्रत्येकजण घरी वाढदिवस करतातच, पण आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने फौंडेशन अंतर्गत गेली सात वर्षे आम्ही सामाजिक वाढदिवस साजरा करत आहोत. शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान, शैक्षणिक मुलं दत्तक घेणे अशा अनेक गोष्टी आम्ही या उपक्रमांतर्गत नेहमीच करत असतो.
यावेळी फौंडेशनच्या उपक्रमाबाबत कौतुक करताना शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ मोहिते म्हणाले, याप्रकारचे वाढदिवस सर्वांनीच साजरे करायला हवेत. रुद्राक्षा फौंडेशनचा हा सामाजिक वाढदिवसाचा उपक्रम खरंच खूप कौतुकास्पद आहे.
यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ.शोभा खलिपे, शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव श्रीकांत खलिपे, Advance खबरचे उपसंपादक शंकर पोळ, शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ मोहिते, शिक्षक किरण पाटील, अंगणवाडी सेविका, तन्मय मोहिते व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
.jpg)


No comments:
Post a Comment