वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार
सातारा, दि.30 - रविंद्र वाकडे.
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) तर्फे लिंगायत समाजाचा सामाजिकतेतून आर्थिक विकास व्हावा व तरुण ,तरुणी ,व्यावसायिक ,उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यातून समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ' व्हाया ' तर्फे गेल्या 12 वर्षातून महाराष्ट्रात व्यावसायिक प्रदर्शन ,सेमिनार,एक्स्पो ,नोकरी महोत्सव असे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.
एकमेव आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक संघटना असलेल्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ने यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील व्यापारी ,उद्योजक यांच्या मध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी व तरुण व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी यावर्षी ' व्हाया एक्स्पो 2023 ' हुबळी कर्नाटक येथे आयोजित केला आहे.त्यासंदर्भात आढावा बैठक 'केएलई विद्यापीठ ' हुबळी येथे
'के एल ई ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लिंगायत भूषण मा. खा.प्रभाकरजी कोरे साहेब व लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे ,व्हाया सेक्रेटरी गुड्डीमठ साहेब ,व्हाया युथविंग अध्यक्ष प्रदीप साखरे व 'ए आय व्ही एम् 'चे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हुबळी ,धारवाड,बेळगाव,बेंगळुरू येथील उद्योजक उपस्थित होते.





No comments:
Post a Comment