एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार
एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार
सातारा, दि.28 -प्रा.अजय शेटे.
वडूज येथील म.फुले प्राथमिक शाळेतील स्पर्धा परीक्षा एन.एस.एस. ई.मध्ये उत्तम गुण मिळवून क्रमांक व यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा सत्कार समारंभ उच्च न्यायालय नियुक्त सदस्य मा.सतीश शेटे, मा.गोविंद भंडारे यांचे हस्ते आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप व स्पर्धा परीक्षा बाबतचे मनोगत या परीक्षेच्या आयोजक संचालिका सौ.भारती सागर पवार मॅडम यांनी केले.
म.फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शितल पवार यांनी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी केलेल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. हु.परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य मा.महेश गोडसे सर् यांनी विद्यार्थी - विद्यार्थिनी ,सह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून ,मार्गदर्शन ही केले.
यावेळी संचालक सतीश शेटे म्हणाले की ,सर्व गुणी विद्यार्थी हे या शाळेची खरी संप्पती आहे.शाळेतील शिक्षिका,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शिका व पालक वर्ग यांचेमुळे विद्यार्थ्यांची खरी जडणघडण होत असते.
यावेळी संचालक मा. गोविंद भंडारे यांचेही भाषण झाले.त्या वेळी त्यांनी सांगितले की,विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेत अनेक उपक्रम राबवून ,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो.
या कार्यक्रमाला डॉ.हेमंत पेठे,श्री.नितीन जाधव यांनीही शुभचिंतन व्यक्त करून यशस्वी विद्याथ्र्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला सौ. खाडे मॅडम यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी चि.ओजस अजय शेटे व त्याचे पालक सौ.मनिषा अजय शेटे मॅडम यांचाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून संचालक मा.सतीश शेटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच इतर सर्व गुणी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. म.फुले शाळेच्या सर्व शिक्षिका,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,विद्यार्थी - विद्यार्थिनी हजर होते.




No comments:
Post a Comment