Saturday, September 24, 2022

अर्थसिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन

 

 अर्थसिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन 


 अर्थसिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन 

सातारा, दि.25 -रविंद्र वाकडे. 

ष. ब्र.श्री 108 महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या आशिर्वादाने अर्थ सिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगा देवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सुहाग मंगल कार्यालय,बिबवेवाडी ,पुणे 411037 या ठिकाणी अर्थ सिद्धी पतसंस्था राबविणार असलेल्या नवीन विविध योजनांचा शुभारंभ तसेच वीरशैव इंटरनॅशनल व लिंगायत संघर्ष समिती प्रणित  ' शुभयोग ' वधू-  वर सूचक मंडळांचे उद्घाटन असे  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


तसेच याच कार्यक्रमात पुणे जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने  आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाले बद्दल समाजातील मान्यवर  मा.ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे व मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्याधिकारी (OSD) व मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष,मंत्रालय ,मुंबई चे कक्ष प्रमुख मा.मंगेशजी नरसिंह चिवटे या दोन मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.


      या कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळेवर सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन विनीत श्री. सुनिल नामदेवराव रुकारी( मा.अध्यक्ष, श्री सहकारी बँक लि.,श्री.अनिल भरतशेठ गाडवे ( जेष्ठ संचालक,श्री विश्वेश्वर सहकारी बँक लि.,श्री.भगवान चंद्रकांत कोठावळे ( मा.अध्यक्ष ,अर्थासिद्धी पतसंस्था ) ,श्री.श्रीकांत शामराव तोडकर ( मा.उपाध्यक्ष , अर्थसिद्धी पतसंस्था) ,श्री.अशोक नामदेवराव रुकारी ( मा.अध्यक्ष श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट ), श्री.नरेंद्र मार्तंडाप्पा व्यवहारे ( मा.उपाध्यक्ष श्री संत  शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट),डॉ.महादेव एस.सगरे ( मा.अध्यक्ष काशी विश्वनाथ शिक्षण संस्था ) श्री.विजय शंकर उत्तुरे ( मा.उपाध्यक्ष, काशी विश्वनाथ  शिक्षण संस्था ) यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...