वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न
वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न
सातारा, दि.30 -प्रा.अजय शेटे.
शिवदत्त दुर्गा उत्सव मंडळ ,वडूज तर्फे सालाबाद प्रमाणे चालू 18 व्या वर्षी गुरूनिर्वाण महारुद्र पशुपती वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम येथील श्री विठ्ठल मंदिर येथे गुरूवार दि.29 रोजी संध्याकाळी 6 ते 7.30 या वेळेत पार पडला.
यावेळी वंदनीय श्री कोळेकर महाराज यांनी सांगितले की, श्री दुर्गा देवीची नऊ रूपे व तिच्या अनुषंगाने येणारे तिचे नऊ रंग हे तिच्या ठायीच्या अनेक शक्तींचे प्रतीक आहे.त्यातून महिलांनी सद्गुण घेवून आपले दैवी व आध्यात्मिक जीवन घडवावे.तसेच संसार व समाज कार्यात कार्यरत रहावे.
ते पुढे म्हणाले की,आपले आराध्य दैवत भगवान श्री शिवशंकर असून ,त्याची भक्तीच आपणास जीवनात तारून नेते.भक्तीयोग आणि कर्मयोग हा आपला पाया असून ,आपले धर्मग्रंथ व गुरू हेच आपले मार्गदर्शक आहेत.त्यांनी घालून दिलेल्या चालीरिती प्रमाणे आपण आपली धर्म वाटचाल केली पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अजय शेटे यांनी केले.श्री.कुमारकाका शेटे यांच्या हस्ते श्री महाराजांचा यथोचित सत्कार करण्यात आला.श्री.संजय येवले यांनी श्री महाराजांचे पाद्यपूजन केले.श्री.बसवेश्वर येवले यांनी पंचारती ओवाळणी केली. श्री.राजेंद्र शेटे यांनी आरती गायन केले.श्री.सोमनाथ येवले यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
मंडळ व्यवस्थापन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल टाकणे,वैभव टाकणे,गजानन गाडवे, अशोक जोशी अथक परिश्रम घेवून सेवाकार्य करतात.
श्री.शेखर भाऊ म्हामणे, दत्तात्रय येवले, अमित गाडवे,विकास ठिगळे, सागर येवले,दत्तात्रय गाडवे, शंकर एकांडे, राहूल म्हामणे , मिलिंद लंगडे,सुहास येवले यांचे मार्गदर्शन लाभते.
श्री शिवयोगिनी लघुरुद्र महिला मंडळच्या सर्व सदस्य महिला सदस्या व महिला कुटुंबीय श्री दुर्गा मातेची मनापासून भक्ती करून सेवा करतात.
श्री दुर्गा देवीच्या आरतीचा मान रोज नवीन कुटुंबांना दिला जाऊन त्यांच्या तर्फेच सात्विक प्रसाद वाटप केले जाते.रोज महिला व लहान मुले - मुली यांचा रास दांडिया,भोंडला,संगीत खुर्ची,चमचा लिंबू, पोत्याची शर्यत असे खेळ खेळले जातात.श्री दुर्गा देवीस रोज नवीन रंगाची साडी नेसवली जाऊन शुभ पूजा केली जाते.महाप्रसाद अर्पण केला जातो.






No comments:
Post a Comment